जाहिरात

ज्या कंपनीचे मालक वडील, त्याच कंपनीत कर्मचारी म्हणून राबले रतन टाटा

1962 साली रतन टाटा हे परदेशातील एक मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात परत आले होते. त्यावेळी त्यांच्या समोर त्यांच्या वडीलांच्या उद्योगात एका मोठ्या पदावर बसून कारभार सांभाळण्याचा पर्याय होता.

ज्या कंपनीचे मालक वडील, त्याच कंपनीत कर्मचारी म्हणून राबले रतन टाटा
मुंबई:

जर कोणाचे अजोबा किंवा वडील करोडो रूपयांच्या उद्योगांचे मालक असतील, तर तो मुलगा त्याच कंपनीत सामान्य कर्मचाऱ्या प्रमाणे नोकरी करेल का? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर त्याचे आपोआप उत्तर असेल नाही. पण रतन टाटां बाबत थोडं वेगळं घडलं होतं. त्यावेळी रतन टाटां बरोबर काय घडलं होतं ते आपण जाणून घेणार आहोत. 1962 साली रतन टाटा हे परदेशातील एक मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात परत आले होते. त्यावेळी त्यांच्या समोर त्यांच्या वडीलांच्या उद्योगात एका मोठ्या पदावर बसून कारभार सांभाळण्याचा पर्याय होता. पण त्यांनी तसं केले नाही. त्यांनी उद्योगातील बारकावे समजावून घेण्यासाठी त्यांनी आपल्याच कंपनीत एक कर्मचारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्या कंपनीचे मालक टाटा कुटुंबातील सदस्य होते, त्याच कटुंबातील रतन टाटा हे एक वेळ होती की ते चुना आणि दगड भट्टीत टाकण्याचे काम करत होते. हे काम करत असतानाच ते व्यवसायातील बारकावे शिकत गेले. पुढे 1991 मध्ये त्यांनी टाटा कंपनीची सुत्र आपल्या हातात घेतली. रतन टाटा यांना सुरूवातीच्या काळात IBM सारख्या कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र जेआरडी टाटा यांना ते पटले नाही. त्यांनी रतन टाटा यांना फोन लावला. त्यांच्याकडून त्यांचा बायोडेटा मागवला. पण त्या कळात रतन टाटा यांच्याकडे बायोडेटा नव्हता. त्यानंतर काही तरी करून तो तयार केला आणि जेआरडी यांना पाठवला. 

ट्रेंडिंग बातमी - 'श्रीमंत असून देखील...' राज ठाकरेंची रतन टाटांसाठी भावनीक पोस्ट

जेआरडी टाटा यांचा ज्यावेळी फोन आला होता, त्यावेळी रतन टाटा हे IBM च्या ऑफीसमध्येच होते. त्या वेळी ते म्हणाले होते की तू भारतात राहून इतर कंपनीत कसे काय काम करू शकतो. त्यानंतर जेआरडी यांनीच रतन टाटा यांना टाटा समूहात नोकरी दिली. ती त्यांची पहीली नोकरी होती. रतन टाटा एक कर्मचारी म्हणून टाटा समूहात जवळपास सहा वर्ष काम करत होते.ते जमशेदपूरच्या फॅक्टरीमध्येही राहीले आहेत. त्यांनी सुरूवातीच्या काळात शॉपफ्लोर मजूरा प्रमाणे कामही केले आहे. त्यावेळी मजूरांसाठी असलेला निळा ड्रेस त्यांना घालावा लागत होता.

ट्रेंडिंग बातमी - अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...

रतना टाटांच्या निधनानंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो मध्ये रतन टाटा हे जेआरडी टाटा यांच्या बरोबर दिसत आहेत. जेआरडी एका कारमध्ये सुटाबुटात दिसत आहेत. तर रतन टाटा त्यांच्या समोर एका सामान्य कर्मचाऱ्या प्रमाणे बसले आहेत. ज्यावेळी त्यांनी टाटा समूहात नोकरीला सुरूवात केली त्यावेळचा हा फोटो असावा असे सांगितले जात आहे. या फोटो वरून रतन टाटा यांचा साधेपणा आणि काही तरी शिक्षण्याची भूख दिसून येते. ते आपल्याच कर्मचाऱ्यांबरोबर सहज मिसळत होते. 

ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: रतन टाटांच्या जाण्यानं हळहळ, राज्यात एक दिवसाचा दुखवटा

आजच्या युवकां समोर रतन टाटा हे रोल मॉडेल आहेत. रतन टाटा जेवढे मोठे उद्योजक होते तेवढच मोठे त्यांचे मन ही होते. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गरजवंताच्या मदतीसाठी तयार असायचे. या मागचे सर्वात मोठे जर कोणते कारण असेल तर ते होते त्यांची समाजाशी असलेली बांधीलकी.आज ते जरी आपल्यातून निघून गेले असतील तरी ते युवकांसाठी प्रेरणादायी असेच आहेत हे मात्र नक्की. 

Previous Article
Ratan Tata: रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात, त्यांना नेमके काय झाले होते?
ज्या कंपनीचे मालक वडील, त्याच कंपनीत कर्मचारी म्हणून राबले रतन टाटा
sate-government-80-decisions-taken-in-cabinet-meet-cm-eknath-shinde
Next Article
सुपरफास्ट महायुती सरकार ! 1 तास 48 मिनिटांच्या बैठकीत झाले 80 निर्णय, कुणाचा होणार फायदा?