उद्योजक रतन टाटांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवले. मात्र एका क्षेत्रात त्यांना यश मिळवता नाही आले. ते क्षेत्र म्हणजे चित्रपट सृष्टी. चित्रपट सृष्टीबाबत रतन टाटा यांना आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी एकदा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात पैसे गुंतवलेले होते. पण, त्या बदल्यात त्यांना करोडोंचे नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर कधीही रतन टाटा यांनी चित्रपट सृष्टीत गुंतवणूक केली नाही. पण त्यांचे बॉलिवूडवर प्रेम नेहमीच राहीले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एक यशस्वी उद्योजक म्हणून रतन टाटांना केवळ भारतातच नाही तर, जगभरात मानाचे स्थान आहे. त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले. त्यात यशही संपादीत केले. एकेकाळी त्यांना बॉलिवूडमध्येही विशेष रस होता. त्यासाठी त्यांनी चित्रपट निर्मितीत करोडो रुपये गुंतवले होते. मात्र त्यांना त्यांच्या इतर व्यवसायांप्रमाणे या व्यवसायात काही यश मिळवता आले नाही. उलट गुंतवलेले पैसेही त्यांचे वसूल झाले नाहीत. त्यांना तोटा सहन करावा लागला होता.
ट्रेंडिंग बातमी - 'श्रीमंत असून देखील...' राज ठाकरेंची रतन टाटांसाठी भावनीक पोस्ट
टाटांनी अमिताभ बच्चन यांच्या 'ऐतबार' चित्रपटात पैसे गुंतवले होते. पण,त्यावेळी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला.
ही 2004 सालची घटना आहे. 'ऐतबार' हा एक रोमॅन्टिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. विक्रम भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फिअर' या हॉलिवूड चित्रपटावर आधारित होता. याची कथा, एका मनोरुग्ण प्रियकरापासून आपल्या मुलीला वाचवणाऱ्या बापाची होती. रतन टाटांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या.अमिताभ बच्चन, बिपाशा बसू आणि जॉन अब्राहमहसारखे दिग्गज कलाकार असतानाही बॉक्स ऑफिस वर हा चित्रपट सपशेल आपटला होता.
हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण अमिताभ बच्चन, बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांच्या'ऐतबार'मधील अभिनयाचे खूप कौतुक झाले. चित्रपटाचे बजेट 9.50 कोटी रुपये होते. पण केवळ 7.96 कोटी इतकीच कमाई झाली. त्यामुळेच रतन टाटांचे सुमारे अडीच कोटींचे नुकसान झाले. असं म्हटलं जातं की,'ऐतबार'च्या खराब परफॉर्मन्सनंतर रतन टाटांनी कधीच चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले नाहीत. त्यामुळे ते चित्रपटसृष्टीपासून दुरावले. पण त्यांची चित्रपट पाहण्याची आवड काही कमी झाली नव्हती.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: रतन टाटांच्या जाण्यानं हळहळ, राज्यात एक दिवसाचा दुखवटा
रतन टाटा एकदा सिमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीवरील प्रेमाबद्दल सांगीतले होते. 'तुम्ही टेलिव्हिजनवर चित्रपट पाहणे टाळू शकत नाही. उलट हे चित्रपट पाहिल्यामुळे माझे हिंदी सुधारले आहे. तरी, बॉलीवूड चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधिक हिंसाचाराबद्दल ते गंमतीने म्हणाले होते की, मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये असलेल्या केचप पेक्षा जास्त केचप चित्रपटांच्या चित्रीकरणावेळी लागतो. त्यांना हिंसाचार आवडत नव्हता. त्याबाबत त्यांनी स्पष्ट मते व्यक्त केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world