Trending News: भारतातील सर्वात सुरक्षित बँक कोणती? RBI ने जाहीर केली यादी, तुमच्या बँकेचे नाव या यादीत आहे का?

हे नियम 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहेत, ज्यामुळे बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत होईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Safest Bank: सर्वज जण मेहनत करतात. आपल्या मेहनतीचे पैसे सुरक्षित रहावेत म्हणून ते बँकेत ठेवतात. पण गे सेव्हिंग अकाऊट असेल की वेगवेगळ्या योजना असोत ठेवीच्या स्वरूपात हे पैसे ठेवले जातात. आपले जमा पुंजी सुरक्षित ठिकाणी आहे याचं समाधान यातून लोकांना मिळत असतं. पण अनेक वेळा या ठेवी सुरक्षित नसतात. काही बँका या दिवाळखोरीत निघतात. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे डुबतात. कष्टाने मेहनतीने घाम गाळून कमवलेली पै अन् पैस अशा प्रकारे डुबते. पण आता काळजी करू नका. आरबीआयने भारतातल्या सुरक्षित बँकांची यादीच जाहीर केली आहे.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच देशातील 'डोमेस्टिक सिस्टिमली इम्पॉर्टंट बँक्स' (D-SIB) म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बँकांची यादी जाहीर केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँक यांनी त्यांचे D-SIB चे स्थान कायम राखले आहे. या बँकांना 'Too Big To Fail' असेही संबोधले जाते. याचा अर्थ असा की, जर यापैकी कोणतीही बँक आर्थिक संकटात सापडली, तर त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. त्यामुळे, ग्राहकांची सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता जपण्यासाठी सरकार आणि RBI या बँकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

नक्की वाचा - Shocking news: एक चूक अन् खेळ खल्लास! गर्भवती तरुणीला रुग्णालयात आणलं पण तिच्या सोबत भयंकर घडलं

D-SIB म्हणून वर्गीकृत केल्यामुळे, या बँकांना सामान्य बँकांच्या तुलनेत अधिक कठोर नियम पाळावे लागतात. त्यांना जोखीम असलेल्या मालमत्तेच्या (Risk-Weighted Assets) प्रमाणात अतिरिक्त भांडवल (Additional CET 1) राखून ठेवणे बंधनकारक असते. RBI ने या बँकांना विविध 'बकेट्स'मध्ये ठेवले आहे:

नक्की वाचा - Solapur News: गर्भवती तरुणी X-ray काढण्यासाठी रुग्णालयात आली, एक्स रे काढण्याच्या नावावर तिच्या सोबत...

  • SBI बकेट 4 मध्ये (0.80% अतिरिक्त भांडवल)
  • HDFC बँक बकेट 2 मध्ये (0.40% अतिरिक्त भांडवल)
  • ICICI बँक बकेट 1 मध्ये (0.20% अतिरिक्त भांडवल)

हे नियम 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहेत, ज्यामुळे बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत होईल. यातून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  या घोषणेमुळे या तिन्ही बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुमचे पैसे देशाच्या सर्वात मजबूत आर्थिक स्तंभांवर सुरक्षित आहेत, हे यातून स्पष्ट होते. बँकांना आर्थिक धक्के सहन करण्याची ताकद मिळते आणि मोठ्या संकटातही सरकारचा पाठिंबा मिळतो. या बँका देशाच्या आर्थिक विकासात आणि पेमेंट सिस्टीममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. RBI चे हे पाऊल देशाच्या बँकिंग व्यवस्थेची स्थिरता वाढवण्यासाठी आहे.

Advertisement

नक्की वाचा - Toll Tax Relief: टोल बाबत नितीन गडकरींनी संसदेत दिली 'गुड न्यूज' म्हणाले आता 1 वर्षात देशात टोल...'