जाहिरात

Shocking news: एक चूक अन् खेळ खल्लास! गर्भवती तरुणीला रुग्णालयात आणलं पण तिच्या सोबत भयंकर घडलं

पंढरपूरमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.

Shocking news: एक चूक अन् खेळ खल्लास! गर्भवती तरुणीला रुग्णालयात आणलं पण तिच्या सोबत भयंकर घडलं
  • पंढरपूरच्या आरती सुरज चव्हाण या गर्भवती तरुणीचा मृत्यू
  • चुकीच्या रक्तगटाचे रक्त दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
  • सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना आरतीचा मृत्यू झाला.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सोलापूर:

एखाद्या महिलेसाठी आई होणं हो स्वप्न असतं. तिच्या आयुष्यातला तो सर्वात आनंदाचा क्षण असतो. ज्या वेळी एखादी महिला गर्भवती राहते त्या दिवसा पासून तिचे सर्वच जण फुला प्रमाणे काळजी घेतात. येणाऱ्या पाहुण्यांची सर्वच जण आतूरतेने वाट पाहात असता. प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या चाचण्यांपासून पोषक आहारापर्यंत सर्वच गोष्टींची बारकाने काळजी घेतली जाते. घरातले मोठे थोर याकडे बारकाईने लक्ष देत असतात. पण कुठे काही तरी चूक राहूनच जाते. अशीच एक धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये समोर आली आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

नक्की वाचा - Toll Tax Relief: टोल बाबत नितीन गडकरींनी संसदेत दिली 'गुड न्यूज' म्हणाले आता 1 वर्षात देशात टोल...'

आरती सुरज चव्हाण या 22 वर्षीय विवाहीत तरुणी पंढरपूरची होती. ती गर्भवती होती. मात्र या काळात तिच्या अंगातील रक्त कमी झाले होते. त्यामुळे तिला रक्त चढवण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पंढरपूरातील एक रक्तपेढीतून तिच्यासाठी रक्त घेण्यात आलं. तेच रक्त तिला देण्यात आलं. तिची प्रसुती होणार होती.त्यामुळे तिला पंढरपूरमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. पण त्यानंतर आरतीचे प्रकृती बिघडली. अचानक  काय झालं आहे ते त्यांच्या लक्षात आलं नाही. 

नक्की वाचा - Solapur News: गर्भवती तरुणी X-ray काढण्यासाठी रुग्णालयात आली, एक्स रे काढण्याच्या नावावर तिच्या सोबत...

पंढरपूरमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. पण तिच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती. म्हणून कुटुंबीयांनी तिला तातडीने सोलापूरच्या रूग्णालयात हलवलं. तिथे तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. पण तिचा जीव वाचू शकला नाही. तिचा सोलापूरमधील रूग्णालयात मृत्यू झाला. आरतीला संबंधीत रक्तपेढीने चुकीच्या रक्तगटाचे रक्त दिले होते असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे ही त्यांनी सांगितले. 

नक्की वाचा - Trending News: फुकट इंटरनेटचा धमाका! 'ही' आहे महाराष्ट्रातील पहिली फ्री WiFi देणारी महापालिका

त्यामुळे आरतीचे कुटुंबीय आता त्या रक्तपेढीच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया करणार आहेत. दरम्यान 22 वर्षाच्या आरतीचा यात मृत्यू झाला. शिवाय या जगात येवू पाहाणाऱ्या बाळाचा ही हे जग पाहण्या आधीच मृत्यू झाला. त्यामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे. आरतीच्या कुटुंबीयांवर तर आभाळ कोसळलं आहे. त्यांना आरतीचा मृत्यू झाला आहे यावर विश्वासच बसत नाही. घरात बाळ येणार म्हणून सर्वच जण खूष होते. पण अचानक सर्वांवर दुख:चा डोंगल कोसळला.  

नक्की वाचा - December 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेचे शुटींग कुणी केले? 'या' अवलियामुळे ते शक्य झाले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com