पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर

परीक्षेला एसईबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आल्याने त्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.

Advertisement
Read Time: 1 min

रेवती हिंगवे, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 7263 उमेदवार पात्र ठरले असून ही टक्केवारी 6.66 आहे. विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. त्यानुसार 39 वी सेट परीक्षा 7 एप्रिल रोजी 17 शहरांमधील केंद्रांवर घेण्यात आली होती. एकूण 1 लाख 9 हजार 250 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. 

मात्र, या परीक्षेला एसईबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आल्याने त्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.

Topics mentioned in this article