अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Robbery News: पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच पुण्याच्या भोर तालुक्यातील स्वप्नलोक सोसायटीमध्येही चोरीची भयंकर घटना घडली आहे. या ठिकाणी एकाच रात्री 5 घरांमध्ये घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंद घरांच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 6 लाख 39 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.याप्रकरणी भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांना दोन फ्लॅटमध्ये काहीही मिळालं नाही, पण..
मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व कुटुंबे वैयक्तिक कामानिमित्त घराबाहेर गेली होती.त्यावेळी चोरट्यांनी संधी साधून रात्रीच्या सुमारास घरात जाऊन डल्ला मारला. चोरट्यांना पाच पैकी तीन फ्लॅटमध्ये सोने तसेच रोख रक्कम मिळाली. मात्र दोन फ्लॅटमध्ये काहीही मिळाले नाही. त्या तीन फ्लॅटमधून रोख रक्कम 62 हजार 500 रुपये तसेच 5 लाख 68 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.त्यानंतर संबंधीत घरमालकांना या चोरीच्या घटनेबाबत कळलं.
नक्की वाचा >> Accident News: खड्ड्याने घेतला जवानाचा बळी! मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यात बुलेट आपटून अपघात
नागरिकांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि..
त्यानंतर त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि या घटनेची तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांच्या विरोधात भोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.परिसरात चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.याप्रकरणाचा भोर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नक्की वाचा >> छत्रपती संभाजीनगरमधील हृदयद्रावक घटना! अवघ्या 2 वर्षाच्या मुलीसोबत घडलं भयंकर, घटना वाचून डोळ्यात येईल पाणी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world