पुण्यातील आघाडीची खासगी रुग्णालय साखळी सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospitals) साखळी विकत घेण्यासाठी मणिपाल हॉस्पिटल्स (Manipal Hospitals) समूहाशी व्यवहार झाला होता. तब्बल 6400 कोटी रुपयांचा हा व्यवहार होता. सह्याद्री हॉस्पीटल साखळी आणि मणिपाल हॉस्पिटल यांच्यातील हा व्यवहार भारतातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक मानला जात होता. या व्यवहारानंतर पुण्याती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे, ज्यामुळे हा संपूर्ण व्यवहारच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा: मराठी माणसाने उभ्या केलेल्या 'सह्याद्री' हॉस्पिटल साखळीची विक्री, 6,400 कोटींना झाला सौदा )
महापालिकेच्या जागेचा परस्पर विक्री व्यवहार?
राजेंद्र कोंढरे यांनी या व्यवहाराबद्दल बोलताना म्हटले की, पुणे महापालिकेने 1998 साली सह्याद्री हॉस्पिटल्सला 1 रुपया दराने 22 हजार स्क्वेअर फूट जागा 99 वर्षांच्या कराराने दिली होती. ही जागा सह्याद्री हॉस्पिटलला देत असताना ती धर्मादाय कारणांसाठी देण्यात येत असल्याचे म्हटले होते. डेक्कन परिसरातील ही जागा असून, धर्मादाय कारणांसाठी देण्यात आलेल्या या जागेचा विक्री व्यवहार कसा होऊ शकतो असा सवाल कोंढरे यांनी विचारला. महापालिकेने सह्याद्रीला दीर्घकाळासाठी नाममात्र दराने जागा भाड्याने दिल्याची महापालिकेने दिलेली कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे कोंढरे यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा: टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरुमचं आज मुंबईत उद्घाटन, CM फडणवीसांची उपस्थिती )
विक्री व्यवहार आणि मणिपाल समूहाचा विस्तार
Ontario Teachers' Pension Plan (OTPP) या कॅनडास्थित गुंतवणूकदार संस्थेने (Canadian Investor) सह्याद्री हॉस्पिटल्समधील आपला प्रमुख हिस्सा मणिपाल समूहाला विकला आहे. ओटीपीपीने 2022 मध्ये सह्याद्रीमध्ये गुंतवणूक केली होती आणि तीन वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलच्या साखळीचा विस्तार केला होता. सह्याद्री हॉस्पीटल साखळी समूह घेतल्यानंतर मणिपाल हॉस्पिटल्सकडे देशभरात 49 हॉस्पीटल्स आणि 12,000 हून अधिक बेड्स असलेलं विस्तृत आरोग्यसेवा जाळं तयार झालं आहे अशी माहिती देण्यात आली होती. मणिपाल हॉस्पिटल्स लवकरच आयपीओ (IPO) म्हणजेच शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या तयारीत आहे, त्यापूर्वी हा व्यवहार अडचणीत आल्याने यापुढे मणिपाल हॉस्पिटल नेमका काय निर्णय घेतंय हे बघणं महत्त्वाचे ठरेल. सह्याद्री हॉस्पिटल्सची पुण्यासह नाशिक (Nashik), कराड (Karad) आणि अहमदनगर (Ahmednagar) येथे 11 रुग्णालये असून या रुग्णालांद्वारे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सेवा दिली जाते.
( नक्की वाचा: SIP करून 10 वर्षांत कोट्यधीश होण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घ्या सक्सेसफुल फॉर्म्युला )