सैफ अली खान यांच्यावर त्याच्या राहत्या घरात हल्ला झाला. त्याच्यावर चाकूचे सहा वार करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोराने तिथून पळ काढला. हल्ला झाल्यानंतर सैफ अली खान हा रिक्षाने लिलावती रुग्णालयात गेला होता. त्यावेळी नक्की काय झालं हा संपुर्ण थरार रिक्षा चालक भजनसिह राणा यांनी सांगितला आहे. विशेष म्हणजे रिक्षामध्ये बसलेली व्यक्ती सैफ अली खान आहे हे ही आपल्याला माहित नव्हते असं ही त्यांने सांगितलं आहे. आपण त्यावेळी घाबरलो होतो. आपण तर फसणार नाही याची भीती वाटत होती. पण त्यांचा जीव वाचावा यासाठी आपण त्यांना रिक्षा बसवले आणि वेळेत लिलावती रुग्णालयात सोडले असं त्यांनी सांगितलं. या वेळात काय काय झालं याचा थरार त्यांनी सांगितला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भजनसिंह राणा हे रिक्षाचालक आहे. वांद्रे पश्चिमेला ते ज्या दिवशी सैफ अली खानवर हल्ला झाला त्यावेळी लिंकींग रोडवरून जात होते. ज्यावेळी त्यांची रिक्षा सैफ अली खान याच्या बिल्डींग जवळ आली त्यावेळी एक महिला रिक्षा रिक्षा असं ओरडत बाहेर आली. तिच्या सोबत अन्य काही लोकही होते. काही तरी झालं आहे म्हणून आपण रिक्षा गेटमध्ये घेतली. त्यानंतर सफेद रंगाचा कुर्ता घातलेला एक व्यक्ती आला. त्याचा कुर्ता पुण पणे रक्ताने माखला होता. त्याच्या बरोबर एक सात आठ वर्षाचा मुलगा होता. शिवाय एक व्यक्ती पण होती.
सुरूवातील हे दृष्य पाहून आपण घाबरलो. काही मारामारी झाली असेल असं आपल्याला वाटलं. यात आपण फसणार तर नाही ना याची भिती वाटली. सर्व गोंधळ तिथे सुरू होता. अशा स्थितीत ते तिघे रिक्षात बसले. तोपर्यंत रिक्षात बसलेले कोण आहेत हे काही समजले नाही. रिक्षात बसल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला रिक्षा घ्यायला सांगितली. त्यावर भजनसिंह यांनी लिलावती की हॉली फॅमेली हॉस्पिटलला जायचं आहे अशी विचारणा केली. त्यावर लिलावतीमध्ये रिक्षा घ्यायला जखमी व्यक्तीने सांगितलं असं भजनसिंह सांगतात. त्यानंतर रिक्षा लिलावतीच्या दिशेने नेण्यात आली.
ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई
आपल्या रिक्षात सैफ अली खान आहे हे आपल्याला समजलं नव्हतं. इमर्जन्सी असल्याने आपण पटापट त्यांना लिलावतीला पोहोचवलं. ज्या वेळी रिक्षा लिलावतीच्या गेटवर आली त्यावेळी गार्डला बोलावण्यात आलं. त्यावेळी सैफ अली खान यांनी स्वत: आपण सैफ अली खान असल्याचं सांगत डॉक्टरांना बोलवा असं सांगितलं. त्यानंतर ते सैफ अली खान होते हे आपल्याला समजले असं भजनसिंह यांनी स्पष्ट केलं. ज्या वेळी सैफ उतरून हॉस्पिटलला जात होते त्यावेळी त्यांच्या पाठीत वार झाल्याचे दिसले. त्यातून रक्त येत होते. त्यांचा पुर्ण कुर्ता रक्ताने माखला होता असंही ते म्हणाले.
मात्र त्यावेळी त्यांच्या बरोबर करीना कपून नव्हती असंही भजनसिंह सांगतात. ज्यावेळी सैफ अली खान यांच्या बिल्डींग खाली होतो त्यावेळीही करीना कपूर आपल्याला दिसली नाही. रिक्षात छोटा मुलगा आणि एक व्यक्ती बसला होता. तिथे बिल्डींग परिसरातही करीना कपूर नव्हती असंही ते सांगतात. ज्यावेळी बिल्डींग खाली पोहोचलो त्यावेळी रात्रीचे अडीच वाजले होते. ज्या वेळी लिलावतीला पोहोचलो त्यावेळी तीन वाजले होते.