जाहिरात

Dawood News: दाऊदचा दरारा अन् बॉलिवूडचा थरकाप! अभिनेत्री MD कशी वाचली? 'त्या' अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

त्यावेळी माधुरी दिक्षितला सुरक्षा देण्यात आली होती. त्यावेळी एक शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. तो शब्द होता MD.

Dawood News: दाऊदचा दरारा अन् बॉलिवूडचा थरकाप! अभिनेत्री  MD कशी वाचली? 'त्या' अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई:

एक काळ होता त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बॉलिवूडमध्ये चलती होती. अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड यांचं एक अनोखं नातं होतं. अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर बॉलिवूड नाचत होतं असं ही म्हटलं जातं. दाऊदचा दरारा इतका होता की  बॉलिवूडच्या दिग्गजांचा थरकाप उडत होता. मात्र मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा खात्मा केला. त्यानंतर बॉलिवूडनं सुटकेचा निश्वास सोडला. मात्र सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या त्या काळातल्या काही गोष्टी चर्चेत आल्या आहेत. त्या वेळी मुंबई पोलिसांच्या सेवेत असलेले एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी काही गौप्यस्फोट केले आहेत. NDTV बरोबर बोलताना त्यांनी या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

 अविनाश धर्माधिकारी हे मुंबई पोलिसात एसीपी म्हणून कार्यरत होते. बॉलिवूड कलाकारांना आलेल्या धमक्या, खंडणी याबाबतचा तपास त्यांनी केला होता. ते सांगतात की 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्या आधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची इमेज देश विरोधी नव्हती. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकार दाऊदच्या संपर्कात होते. मात्र ज्यावेळी मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यानंतर या कलाकारांनी दाऊत पासून अंतर ठेवायला सुरूवात केली. त्यावेळी धर्माधिकारी यांनी  शाहरुख खान याची याबाबत चौकशी ही केली होती. 

ट्रेंडिंग बातमी - Saif Ali khan Attack : ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण

बॉलिवूडमध्ये त्यावेळी अंडरवर्ल्डचा मोठ्या प्रमाणात पैसा होता. त्यामुळे अंडरवर्ल्ड विरुद्ध बॉलिवूड असा वादही निर्माण झाला होता. त्यातून अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्यावर हल्ले झाले होते. त्यातील अनेकांना आम्हीच हल्ल्यातून वाचवलं होतं. शिवाय राजकुमार संतोषी यांच्यावरील हल्ला आपण स्वत: परतवून लावला होता असं धर्माधिकारी सांगतात. ऐवढच काय तर माधुरी दिक्षितही अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर होती. मात्र आम्ही तिला ही त्यातूनच वाचवलं होतं असं धर्माधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई

त्या काळात अंडरवर्ल्डकडून खंडणीसाठी सर्रास धमक्या दिल्या जात होत्या असं अविनाश धर्माधिकारी सांगतात. त्यात खंडणी मागण्याची आणि स्विकारण्याची पद्धत ही वेगळी होती. खंडणी घेण्याचे प्रकार ही वेगवेगळे होते. त्यावेळी बॉलिवूड स्टार्सना धमक्या दिल्या जात असतं. यात अनेक वेळा अंडरवर्ल्डमधल्या अंतर्गत वादातून दिल्या जात होत्या. अंडरवर्ल्डमधल्या काही टोळ्या जाणिवपूर्वक अभिनेत्यांकडून पैसे उकळत असत. बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात वाढला होता.  हा हस्तक्षेप इतका मोठा होता की कोणत्या चित्रपटात कोण हिरो असेल कोण हिरोईन असेल हे अंडरवर्ल्ड ठरवत होतं.        

ट्रेंडिंग बातमी - Beed Crime : संतोष देशमुखांपूर्वी आवादा कंपनीच्या मॅनेजरचंही केलं होतं अपहरण; बीड खंडणी प्रकरणात मोठी अपडेट

माधुरी दिक्षित ही त्यावेळी सुपरस्टार होती. अविनाश धर्माधिकारी सांगतात की माधुरी दिक्षित बरोबर आपण 12 वी पर्यंत एकत्र शिकत होतो. शिवाय जे. बी. नगरमध्येच राहात होतो. ऐवढेच नाही तर एकाच बस मधूनही आम्ही एकत्रीत प्रवास करत होतो. त्यावेळी माधुरी दिक्षित सेलिब्रेटी नव्हती असं त्यांनी सांगितलं. 12 नंतर माधुरी दिक्षितने कॉलेज सोडलं. त्या काळात माधुरी दिक्षितला वेगळ्या प्रकारचीच भिती दाखवली जात होती. दाऊदचा भाऊ अनीश इब्राहिम होता. त्याला बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये विशेष रुची होती. तो अशा अभिनेत्रींनी जाणिवपूर्वक फोन करत असत. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News : मेव्हण्याला अडकवण्यासाठी वकिलाने केला महिलेचा वापर, बदलापूरमधील भयंकर घटना

त्यावेळी माधुरी दिक्षितला सुरक्षा देण्यात आली होती. त्यावेळी एक शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. तो शब्द होता MD. यावर आम्ही त्या काळी मोठ्या प्रमाणात काम केलं. हा शब्द केवळ माधुरी दिक्षितसाठी वापरला गेला होता असं ही त्यांनी सांगितलं. त्यानंतर माधुरी दिक्षितला आम्ही या धमक्यांपासून वाचवलं होतं. माधुरी प्रमाणे अन्य कलाकारांचाही जीव मुंबई पोलिसांनी वाचवला होता असं ते म्हणाले. बाबा सिद्धीकी यांची हत्या बॉलिवूड बरोबर असलेल्या चांगल्या संबधामुळेच झाली असं ही ते म्हणाले. सध्या मुंबई पोलिसांचे इंटेलिजेंस चांगले आहे. मुंबई पोलिसांना सध्या गँगस्टरची काळजी नाही मात्र दहशतवाद्यांचा धोका मात्र कायम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com