बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींना गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. मात्र एकीकडे सर्व सुरळीत सुरु झालं असलं तर या सर्व घडामोडींदरम्यान एका तरुणाचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर या तरुणाची नोकरी गेली आहे. तसेच ठरलेलं लग्न देखील मोडलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांसमोर आरोपीला अटक करण्याचं मोठं आव्हान होतं. पोलिसांनी 20 हून अधिक पथके आरोपीच्या शोधात तयार केली होती. अखेर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती. आकाश कनौजिया असं अटक केलेल्या 31 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
(नक्की वाचा- Saif Ali Khan Attack : हा तो नव्हेच? सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का)
आकाशला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. आकाशने घडलेल्या प्रकाराबद्ल सांगितलं की, "माझ्याबद्दल ऐकून आणि बातम्यांमध्ये पाहून माझ्या कुटुंबियांना धक्का बसला. मीडियाने मला संशयित आरोपी म्हणून टीव्हीवर दाखवण्यास सुरुवात केली होती. मात्र सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीची मिशी नव्हती आणि माझी मिशी होती. तरीही पोलिसांनी मला ताब्यात घेतलं."
पोलिसांचा मला फोन आला होता. त्यांनी मला कुठे असल्याची विचारणा केली होती. त्यावेळी मी घरी असल्याचं सांगितलं आणि काही वेळातच पोलिसांनी मला ताब्यात घेतलं. मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी निघालो होतो. मात्र त्याआधीच मला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांना चौकशीदरम्यान मला मारहाण देखील केली, असं आकाशने सांगितलं.
(नक्की वाचा - Bangladesh Illegal immigration : आरोपी शहजाद भारतात कसा आला? आधारकार्ड कुठून मिळालं? धक्कादायक खुलासा)
मला माझ्या मालकाने नोकरीवरुन देखील काढून टाकलं आहे. मी फोन करुन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही ऐकण्यास नकार दिला. त्यानंतर माझं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं, त्यांच्या कुटुंबियांनी देखील लग्नाची बोलणी करण्यात नकार दिला आहे, असा दावा आकाश कनौजियाने केला आहे.
आकाशने पुढे म्हटलं की, माझ्यावर कफ परेडमध्ये दोन आणि गुरुग्राममध्ये एक गुन्हा दाखल आहे. मात्र यावरुन मला अशाप्रकारे ताब्यात घेतलं ते योग्य नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे सैफ अली खानच्या इमारतीबाहेर उभे राहून जाब विचारण्याचा विचार करत आहे. कारण त्यामुळेच हे सर्व घडलं आहे.