जाहिरात

Bangladesh Illegal immigration : आरोपी शहजाद भारतात कसा आला? आधारकार्ड कुठून मिळालं? धक्कादायक खुलासा

सैफने पोलिसांच्या ताब्यात देण्याचं म्हटल्यावर मोहम्मदने स्वत:च्या सुटकेसाठी सैफवर हल्ला केल्याची माहिती आहे. 

Bangladesh Illegal immigration : आरोपी शहजाद भारतात कसा आला? आधारकार्ड कुठून मिळालं? धक्कादायक खुलासा

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) करणारा आरोप मोहम्मद शहजाद हा बांगलादेशातून आल्यानंतर बरेच सवाल उपस्थित केले जात आहेत. आरोपी बांगलादेशातून कसा आला? त्याच्याकडे अधिकृत (Accused Mohammad Shehzad is Bangladeshi) कागदपत्र नसतानाही काम कसं मिळालं? तो कुठे राहत होता? भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी त्याला आधारकार्ड विचारलं नाही का? दरम्यान या प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मोहम्मद शहजाद हा बांगलादेश आणि मेघालयमधील डावरी नदी ओलांडून भारतात आल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मोठी चोरी करून बांगलादेशला पळण्याचा प्लान...
शहजाद हा बांगलादेशातील असून त्याच्या घरी आई, बहीण, भाऊ आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. या आधीही शहजाद भारतात आला होता. मात्र छोटं मोठं काम करून फारसं काही हाती मिळत नव्हतं. त्यामुळे तो बांगलादेशात परतला. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सात महिन्यापूर्वी शहजाद पुन्हा भारतात आला. हाताला अपेक्षित काम मिळत नसल्यामुळे मोठी चोरी करून बांगलादेशाला पळण्याचा कट त्याने रचला. मुंबईत आल्यानंतर तो हा परिसर फिरत होता. एका रिक्षाचालकाने त्याला मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील माहिती दिली होती. जेव्हा तो सैफच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेला तेव्हा तो पकडला गेला होता. सैफने पोलिसांच्या ताब्यात देण्याचं म्हटल्यावर मोहम्मदने स्वत:च्या सुटकेसाठी सैफवर हल्ला केल्याची माहिती आहे. 

Saif Ali Khan : हल्लेखोरापेक्षा पिळदार शरीरयष्टी, तरीही अभिनेता स्वत:चा बचाव का करू शकला नाही? अखेर कारण समोर

नक्की वाचा - Saif Ali Khan : हल्लेखोरापेक्षा पिळदार शरीरयष्टी, तरीही अभिनेता स्वत:चा बचाव का करू शकला नाही? अखेर कारण समोर

पश्चिम बंगालमधून आधारकार्ड केलं तयार...
आरोपीने मोहम्मदने सिमकार्ड खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगालचे सिमकार्ड वापरल्याचं समोर आलं आहे. आरोपीने बांगलादेशामधून येऊन काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केले होते. तिथून आधारकार्ड बनवून घेतल्यानंतर त्याने सिमकार्ड खरेदी केले आणि त्यानंतर तो मुंबईला आला. आरोपी मोहम्मदने खुखुमोनी जहांगीर शेख या नावाने सिमकार्ड घेतले होते. बांगलादेशामधून मेघालयमधल्या डावकी नदी ओलांडून आरोपी पश्चिम बंगालमध्ये आला होता. मुंबईतल्या अमित पांडे नावाच्या इसमाने त्याला इथे कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचंही समोर आलं आहे. आरोपीने पहिल्यांदा चौकशीत तो कोलकाताचा रहिवासी असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने बऱ्याच बांगलादेशी नंबरवर कॉल केले असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची कागदपत्रे मागवली असता त्यानुसार तो बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालं. हल्ल्यानंतर आरोपी सैफ अली खानच्या घरातून निघाला आणि तिथल्याच एका गार्डनमध्ये झोपला होता असंही समोर आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com