विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले समरजीत घाटगे भाजपमधून एग्झिट घेणार असल्याची माहिती आहे. आज ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. परिणामी आगामी विधानसभेत कोल्हापूर भागातून महायुतीला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
समरजीत घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दुपारी 4 नंतर घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने त्यांच्याच उपस्थितीत घाटगे हाती तुतारी घेतील. काल समरजीत घाटगे आणि शरद पवारांची भेट झाली होती. कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. त्यामुळे नाराज असलेल्या घाटगेंनी वेगळा मार्ग निवडल्याचं बोललं जातंय. खरंतर समरजीत घाटगे हे फडणवीसांचे जवळचे मानले जातात. मात्र घाटगेंनी हा निर्णय घेतल्याने महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.
नक्की वाचा - "खड्डे बुजवले नाही तर त्याच खड्ड्यात उभे करू", मनसे आमदार राजू पाटलांचा KDMC अधिकाऱ्यांना इशारा
समरजितसिंह घाटगे कोण आहेत ?
समरजितसिंह घाटगे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे (घाटगे) वंशज आहेत. त्यांनी पुण्यातून चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेतले.
वडिलांच्या निधनानंतर छत्रपती शाहू कारखानाच्या निवडणुकीत समरजीत घाटगेंचा विक्रमी मतांनी विजय झाला. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय झाले. 2015 मध्ये समरजितसिंह घाटगेंकडे पहिल्यांदाच अध्यक्षपद सोपवण्यात आलं. म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम भाजपमध्ये असताना घाटगेंकडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. समरजितसिंग घाटगे हे अगदी परवापर्यंत भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 3 सप्टेंबर म्हणजे आज समरजितसिंह घाटगे हे शरद पवारांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world