माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. चार आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते चार आठवड्यापासून मृत्यूशी झुंज देत होते. नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर मलिक यांचे समीर खान हे पती होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समीर खान यांचा 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि त्यांचे पती समीर खान क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तपासणी झाल्यानंतर ते घरी येण्यासाठी कारची वाट बघत उभे होते. त्यावेळी त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती.
ट्रेंडिंग बातमी - पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?
अबुल मोहम्मद सोफ अन्सारी हे गाडी चालवत होते. गाडी चालवत असताना त्यांचा पाय अचानक कारच्या एक्सलेटरवर पडला. त्यावेळी थार कार थेट समीर खान यांच्या अंगावर गेली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूला मार लागला होता. मात्र चार आठवड्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.
मलिक कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवाब मलिक हे नुकतेच जेल मधून बाहेर आले होते. शिवाय ते मानखुर्द विधानसभेतून निवडणुकही लढवत आहेत. तर मुलगी सना मलिक या अणूशक्तीनगर मतदार संघातून मैदानात आहेत. मलिक कुटुंब निवडणुकीच्या तयारीत लागले असतानाही घटना घडली आहे.