जाहिरात

मनोज जरांगे आज भूमिका जाहीर करणार, कुठे आणि किती उमेदवार देणार? बैठकीआधी दिले संकेत

देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बेजार केलं, म्हणून विधानसभा लढवयाला लागलो. आम्हाला निवडणूक लढण्याचा नाद नाही. मात्र आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.

मनोज जरांगे आज भूमिका जाहीर करणार, कुठे आणि किती उमेदवार देणार? बैठकीआधी दिले संकेत

लक्ष्मण सोळुंके, जालना

मनोज जरांगे यांच्याकडून आज 5 वाजता उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. यासाठी जरांगे यांची बैठक सुरू झाली आहे. दरम्यान या बैठकीत काही मतदार संघांची नावे देखील आता समोर येत आहे. ज्यात संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, कन्नड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर बीड आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. त्यामुळे जरांगे यांच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मतदारसंघ निश्चित केले जात आहेत हे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्याही विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय जरांगे घेणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगे पाटील यांनी याआधी म्हटलं की, आमच्या पुढे मोठा राक्षस आहे, त्याची वाट लावायची आहे.  आज आम्ही निर्णय घेणार आहे. जिथे उमेदवार निवडून येणार आहेत तिथे ताकत लावायची आहे. आज आम्ही निर्णय घेणार आहे कोणते उमेदवार द्यायचे, याबाबत जे निवडूण येणार आहेत तेवढेच मतदारसंघ लढायचं आहे. जो कुणी आम्हाला लेखी देईल , व्हिडिओग्राफी करून देईल तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला आम्ही मदत करणार. ओढाताणीच्या नादात ही संधी घालवू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

(नक्की वाचा-  महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा)

राजकारणचं मराठ्यांनी वेड लागू द्यायचं नाही. मी राजकारणात नवीन आहे, त्यामुळे उमेदवार निवडायला उशीर लागत आहे. या निवडणुकीत माझा समाज एकत्र चालणार आहे. इतर समाजाचं मी सांगू शकत नाही. इच्छुक उमेदवार नाराज होतील, मात्र हा आमचा खानदानी व्यवसाय नाही, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बेजार केलं, म्हणून विधानसभा लढवयाला लागलो. आम्हाला निवडणूक लढण्याचा नाद नाही. मात्र आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.

(नक्की वाचा-  लोकसभेनंतर विधानसभेतही 'सांगली पॅटर्न', मनोज जरांगेंसोबत भेटीगाठी)

जातीसाठी आम्हाला 10-20 आमदार पाठवायाचे आहेत. 150- 200 आमदार मराठा आहेत तरी त्यांच्या घरी जायला अधिकार नाही. बाँडवर लिहून द्यायला सगळे तयार आहेत. 100-150 आले असतील बाँडवाले. पण 200 लढून पडण्यात अर्थ नाही. आमच्या मतदारसंघात उमेदवार देऊ नका असं म्हणणारे देखील रात्री बरेच आले होते. मला राजकारणाची व्याख्या बदलायची आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: