समाधान कांबळे, प्रतिनिधी
Ashadhi Wari 2026 Latest News : आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या पालखीचं आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं आहे.संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या पालखीचं संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथून काल प्रस्थान झालं होतं,तर आज संत नामदेव महाराजांच्या पालखी यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.मागील 31 वर्षापासून सुरू असलेली ही पायी दिंडी आजही अविरत सुरू आहे.
सात मानाच्या पालख्यांपैकी एक संत नामदेवांची पालखी
पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सात मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली संत नामदेवांची पालखी ही ओळखली जाते.संत नामदेवांची पालखी हिंगोली शहरामध्ये दाखल झाल्यानंतर हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर भव्य अश्व रिंगण सोहळा पार पडतो.यावर्षी देखील भव्य नेत्रदीपक सोहळा पार पडला आहे.हा नेत्रदीपक अश्व रिंगण सोहळा पाहण्यासाठी हिंगोलीकरांनी मोठी गर्दी केली होती.
नक्की वाचा >> Palghar News: पालघरच्या केळवा धरणाला भगदाड, 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 'त्या' 65 कुटुंबांचं काय?
9 तारखेला पालखी पांडुरंगाच्या चरणी लीन होणार
हिंगोली शहरात अश्व रिंगण सोहळा पार पडल्यानंतर 12 तारखेला दैठणा 14 तारखेला परळी वैजनाथ पंधरा तारखेला आंबेजोगाई तर 16 तारखेला जवळबन येथे संत नामदेव महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडतो.या पालखीचे काल संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळावरून प्रस्थान झाला असून 29 तारखेला ही पालखी पांडुरंगाच्या चरणी लीन होणार आहे.या पालखीमध्ये दीड हजाराच्या वर वारकरी आणि भाविक सहभागी झाले असल्याची माहिती पालखी आयोजकांकडून देण्यात आली आहे.