Satara News : चिमुरडीसह आईची कृष्णा नदीत उडी; मुलीचा मृतदेह सापडला

महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कृष्णा नदीच्या पात्रात सध्या शोधमोहीम सुरु असून दोन वर्षीय मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. पण महिला अद्याप बेपत्ता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुजित आंबेकर, सातारा

सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 27 जुलै रोजी ही घटना घडली असून मुलीचा मृतदेह सापडला आहे. कृष्णेच्या पात्रात उडी घेतलेली महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील आहे. येथे संचिता साळुंखे (वय 22 वर्षे) नावाची एक महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत आणले होते. याच महिलने 27 जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह कृष्णा नदीत उडी मारली आहे. 

Advertisement

महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कृष्णा नदीच्या पात्रात सध्या शोधमोहीम सुरु असून दोन वर्षीय मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. पण महिला अद्याप बेपत्ता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या नदीची पाणीपातळी तब्बल 40 फुटांवर पोहोचली आहे. असे असताना पाण्याच्या प्रवाहात या महिलेचा शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत.

Topics mentioned in this article