सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला; विधानसभेसाठी मविआला पाठिंबा जाहीर, प्रचारही करणार

Satyapal Malik News : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्तेवरून पायउतार करणार असा दावा देखील त्यांनी केला.

Advertisement
Read Time: 2 mins

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांचा सविस्तर चर्चा झाली. भेटीनंतर बोलताना सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्तेवरून पायउतार करणार असा दावा देखील त्यांनी केला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात विधानसभा निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना (UBT), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांचा समावेश आहे.

(नक्की वाचा - सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; वडेट्टीवारांनी सांगितलं मुख्यमंत्री कुणाचा होणार )

आगामी विधानसभा निवडणुकांबाबत सत्यपाल मलिक यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, "भाजपला फक्त मोठा फटका बसणार नाही, तर राज्याच्या निवडणुकीत पक्षाचा सफाया होईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील. तुम्हाला गरज आहे. माझा महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे. मी महाविकास आघाडीसाठी प्रचारही करेन. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणावर लक्षणीय परिणाम करतील." 

(नक्की वाचा-  'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा )

कोण आहेत सत्यपाल मलिक?

 सत्यपाल मलिक केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. सत्यपाल मलिक एकदा आमदार आणि एकदा खासदार राहिले आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी, मलिक हे जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. ते बिहार, ओडिशा, गोवा आणि मेघालयचे राज्यपालही राहिले आहेत.