Pune News: पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेचा आणखी एक कारनामा, दुसरा गुन्हा दाखल

आरोपी गौरी वांजळे हिच्या विरोधात याआधी कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल आहे. यातील फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक न्यायालयामध्ये केस सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यात कोथरूडमध्ये पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त गौरी वांजळे विरोधात पुण्यातील मुंढवा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पती-पत्नीच्या केसमध्ये मदत करते असे सांगत एकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.

ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न

आरोपी गौरी वांजळे हिच्या विरोधात याआधी कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल आहे. यातील फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक न्यायालयामध्ये केस सुरू आहे. या केसमध्ये मदत करते असे सांगून फिर्यादीला गौरी वांजळे यांनी आधी जवळीक साधली. त्यानंतर मी हायकोर्टामध्ये वकील आहे तुला मदत करते असे म्हणून 38 वर्षे फिर्यादीला जवळीक साधत त्याच्यासोबत लगट होण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करत फिर्यादीकडून खंडणी मागितली. मुंढवा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

तरुणावर कसा केला अत्याचार?

याआधीच्या प्रकरणात पीडित तरुणाच्या फिर्यादीनुसार, गौरी वांजळे ही 'वकील' असल्याची बतावणी करून फिर्यादी पुरुषाला सतत धमकी देत होती. या महिलेने फिर्यादीला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला, तसेच त्याचे काही अश्लील फोटो काढले. याच फोटोंच्या आधारावर ती फिर्यादीकडे मोठ्या रकमेची मागणी करत होती. पैशांची मागणी पूर्ण न केल्यास 'खोट्या केसमध्ये अडकवण्याची' धमकीही ती देत होती.

(नक्की वाचा- Nagpur News: तुरुंगात आईची तडफड; बापाने सख्ख्या लेकींचे लचके तोडले; तृतीयपंथीयांकडून मुलींची सुटका)

आरोपी महिलेने तिच्या पुणे येथील राहत्या घरी तसेच तर कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी जाऊनही त्याच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे तिने फिर्यादीला बळजबरीने वाराणसी (काशी विश्वनाथ) या धार्मिक स्थळीही नेले आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार केला.

Advertisement

Topics mentioned in this article