जाहिरात

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला, जमिनीचा भाव वाढवण्यासाठी मोठा भ्रष्टाचार

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गावरून सध्या सोलापूरच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला, जमिनीचा भाव वाढवण्यासाठी मोठा भ्रष्टाचार
Shaktipeeth Expressway Route Change Latest Update

Shaktipeeth Expressway Route Change : नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गावरून सध्या सोलापूरच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.महामार्गातून कोट्यवधींचा मोबदला लाटण्यासाठी राजकीय नेते,बडे अधिकारी आणि काही 'भोंदूबाबांनी' ज्या जमिनींवर डोळा ठेवला होता,त्यांचा प्लॅन आता पुरता फसलाय.महामार्गाचा जुना मार्ग बदलल्यामुळे अनेकांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.नेमकं हे प्रकरण काय आहे,जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सोलापुरात जमीन खरेदीचा मोठा'खेळ'खेळला गेला. महामार्ग कुठून जाणार, याची गुप्त माहिती आधीच मिळवून राजकीय नेत्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रातोरात जमिनी खरेदी केल्या.पण आता या महामार्गाचा नकाशाच बदलला आहे.जुना मार्ग रद्द करून राज्य सरकारने नवा मार्ग निश्चित केल्यामुळे, 'इनसाइडर ट्रेडिंग'करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अनेकांचे कोट्यवधी रुपये पाण्यात

सोलापूर जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग आधी उत्तर सोलापूर आणि सांगोल्यातून जाणार होता. मात्र आता तो बार्शीतून थेट माढा, पंढरपूर आणि माळशिरस या तालुक्यांतून जाणार आहे. जुन्या मार्गावर माजी आमदार दीपक साळुंखे पाटील,परिवहनचे माजी अधिकारी बजरंग खरमाटे आणि काही उद्योगपतींसह चक्क अशोक खरातसारख्या भोंदूबाबांनीही जमिनी घेतल्या होत्या.मात्र मार्ग बदलल्याने या सर्वांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे.

नक्की वाचा >> Mumbai Underworld : मुंबईत अंडरवर्ल्डचा थरार, दया नायक यांच्या खबऱ्याचा 27 वर्षांनी 'गेम', पुतण्यानं घेतला बदला

फक्त जमीन खरेदीच नाही, तर जमिनीचा भाव वाढवण्यासाठी मोठा भ्रष्टाचारही सुरू झाला आहे. 70-30 च्या फॉर्म्युल्याने दलालांची टोळी सक्रिय झालीय.कागदोपत्री जुन्या जमिनींवर फळबागा,विहिरी आणि बोअरवेल दाखवून सरकारकडून जादा मोबदला लाटण्याचा हा गोरखधंदा सुरू आहे.धक्कादायक बाब म्हणजे,नवीन मार्गावरही आता अशाच हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.

"शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलल्याने केवळ जमिनींचे व्यवहारच नाही,तर प्रशासनातील अंतर्गत गटबाजीही समोर आली आहे.अधिकारी आणि नेत्यांनी बेनामी नावाने घेतलेल्या जमिनींच्या चौकशीचे आदेश आता सरकारने दिले आहेत.त्यामुळे आगामी काळात या 'जमीन घोटाळ्यात'कोणकोणते मोठे मासे गळाला लागतात,हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.",अशी माहिती कांग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com