रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Sheetal Tejwani Ranbir Kapoor Connection : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला नुकतीच अटक करण्यात आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यानंतर ती खूप दिवस फरार होती. या जमीन घोटाळा प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुत्र पार्थ पवार यांच्यावरही आरोपांची राळ उडवण्यात आली होती. अशातच आता शीतल तेजवानीचा आणखी कारनामा समोर आला आहे. आरोपी शीतलने अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता, अशी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीटच्या माध्यमातून हे नवं प्रकरण उघडकीस आणलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरूंनी भाडेकरारातील अटी पाळल्या नाहीत, असा आरोप करत त्याच्यावर दावा दाखल करण्यात आला होता. हा दावा ठोकणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून शितल तेजवानी आहे.पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये रणबीर कपूरचे फ्लॅट आहेत.शीतल तेजवानीने करारात नमूद केलेल्या लॉक-इन कालावधीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे नुकसानभरपाई आणि त्यावर व्याजाची मागणी करण्यात आली.हा दावा पुणे दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला असून तेजवानी ने 50.40 लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.
नक्की वाचा >> Pune Video Viral: पुण्यात चाललंय तरी काय? हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावरच हाणलं, मराठी भाषेवरून वाद पेटला
विजय कुंभार यांनी ट्वीटरवर काय म्हटलंय?
विजय कुंभार यांनी ट्वीट करत म्हटलंय की, रणबीर कपूरला कदाचित हेही माहित नसेल की शीतल तेजवानी किती खटल्यांमध्ये अडकली आहे.तिला जमीन माफिया आणि राजकारण्यांचा मजबूत पाठिंबा आहे. शीतल तेजवानी-सूर्यवंशी (सध्या मुंधवा जमीन घोटाळ्यात अटक)हीच ती शीतल एस.सूर्यवंशी आहे जिने 2018 मध्ये रणबीरवर ट्रम्प टॉवर्स फ्लॅटसाठी 50.40 लाखांचा दावा दाखल केला होता.तो खटला अजूनही न्यायप्रविष्ट आहे. पुढील सुनावणी: 05 जानेवारी 2026.