Pune Pustak Mahotsav 2025 : राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव '2025' 13 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान फर्ग्युसन कॉलेज येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून गेल्या तीन वर्षापासून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यात पुणे पुस्तक महोत्सवाचे मोठे योगदान आहे. ‘शांतता पुणेकर वाचत आहेत' उपक्रमात सहभागी व्ह', असं आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी
पुणे पुस्तक महोत्सवाचा एक भाग म्हणून दरवर्षी ‘शांतता पुणेकर वाचत आहेत' उपक्रमाचे 9 डिसेंबर 2025, मंगळवार, सकाळी 11 ते 12 या वेळेत आयोजन केले जाणार आहे, यामाध्यमातून समाजातल्या सर्व घटकांनी आप-आपल्या ठिकाणी आपल्या आवडीचे पुस्तक वाचावे यातून हे अभिप्रेत आहे. पुणे शहरातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा पुस्तक वाचावे व त्यानंतर आपला फोटो काढून क्युआर कोडवर फोटो अपलोड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
नक्की वाचा >> Pune Video Viral: पुण्यात चाललंय तरी काय? हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावरच हाणलं, मराठी भाषेवरून वाद पेटला
पुणे महोत्सवाची वैशिष्ट्ये काय आहेत?
1) 800 पुस्तकांची दालने – सर्व भारतीय भाषांतील साहित्य उपलब्ध.
2) 6 दिवसांचा लिटरेचर फेस्टिव्हल
3) 3 दिवस मराठी साहित्यिक, शैक्षणिक व वैचारिक कार्यक्रमांसाठी राखीव.
4) उर्वरित 3दिवस विविध भारतीय भाषांतील कार्यक्रमांसाठी.
- लेखकांसाठी ऑथर कॉर्नर – लेखकांशी संवाद, पुस्तक प्रकाशन.
- बालकांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर – चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कार्यशाळा.
- दररोज पुस्तक प्रकाशन – जवळपास 70 नवीन पुस्तकांचे प्रकाशन अपेक्षित.
- सांस्कृतिक कार्यक्रम – संगीत, नृत्य, कला सादरीकरणे.
- छायाचित्र स्पर्धा – “Joy of Reading” या विषयावर.
- खाद्यपदार्थांचे 30 + स्टॉल्स – खवय्यांसाठी खास मेजवानी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world