रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Sheetal Tejwani Ranbir Kapoor Connection : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला नुकतीच अटक करण्यात आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यानंतर ती खूप दिवस फरार होती. या जमीन घोटाळा प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुत्र पार्थ पवार यांच्यावरही आरोपांची राळ उडवण्यात आली होती. अशातच आता शीतल तेजवानीचा आणखी कारनामा समोर आला आहे. आरोपी शीतलने अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता, अशी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीटच्या माध्यमातून हे नवं प्रकरण उघडकीस आणलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरूंनी भाडेकरारातील अटी पाळल्या नाहीत, असा आरोप करत त्याच्यावर दावा दाखल करण्यात आला होता. हा दावा ठोकणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून शितल तेजवानी आहे.पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये रणबीर कपूरचे फ्लॅट आहेत.शीतल तेजवानीने करारात नमूद केलेल्या लॉक-इन कालावधीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे नुकसानभरपाई आणि त्यावर व्याजाची मागणी करण्यात आली.हा दावा पुणे दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला असून तेजवानी ने 50.40 लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.
नक्की वाचा >> Pune Video Viral: पुण्यात चाललंय तरी काय? हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावरच हाणलं, मराठी भाषेवरून वाद पेटला
विजय कुंभार यांनी ट्वीटरवर काय म्हटलंय?
विजय कुंभार यांनी ट्वीट करत म्हटलंय की, रणबीर कपूरला कदाचित हेही माहित नसेल की शीतल तेजवानी किती खटल्यांमध्ये अडकली आहे.तिला जमीन माफिया आणि राजकारण्यांचा मजबूत पाठिंबा आहे. शीतल तेजवानी-सूर्यवंशी (सध्या मुंधवा जमीन घोटाळ्यात अटक)हीच ती शीतल एस.सूर्यवंशी आहे जिने 2018 मध्ये रणबीरवर ट्रम्प टॉवर्स फ्लॅटसाठी 50.40 लाखांचा दावा दाखल केला होता.तो खटला अजूनही न्यायप्रविष्ट आहे. पुढील सुनावणी: 05 जानेवारी 2026.
Ranbir Kapoor probably doesn't even know how many civil (?) cases Sheetal Tejwani has been tangled in.
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) December 9, 2025
No surprise—she enjoys solid backing from land mafias & politicians.
FYI: Sheetal Tejwani/ Suryawanshi (now arrested in the Mundhawa land scam) is the same Sheetal S.… pic.twitter.com/MK1EFnKyRw
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात रंगणार 'पुस्तक महोत्सव, तारीख अन् ठिकाण कोणतं? वाचकांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचीही संधी
काय आहे नेमक प्रकरण?
2018 मध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ने पुण्यातील ट्रंप टॉवर मध्ये असलेल्या त्याचा फ्लॅट मधील काही भाडेकरूंना करारनामा संपायच्या आतच बाहेर काढले होते. कुठलीही पूर्वकल्पना न देता त्याने त्यांना घराच्या बाहेर काढले होते असा दावा त्यावेळेस शीतल सूर्यवंशी उर्फ शीतल तेजवानीने केला होता. त्यासाठी तिने कोर्टात नुकसान भरपाईचा दावा केल होता. 50 लाख 40 हजार रुपयांचा नुकसानीचा दावा तिने केला होता. हा दावा तिने पैसे कमावण्याच्या आमिषाने केला असल्याची माहिती समोर येत आहे. या बाबतची पुढील सुनावणी पुणे कोर्टात 5 जानेवारी 2025 ला आहे.
शीतल सूर्यवंशी उर्फ शीतल तेजवानीचे एक नाही तर अनेक कारनामे…
शीतल तेजवानी ही सध्या चर्चेत आहे ते मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी. ती त्याच प्रकरणात अटकेत असून 11 डिसेंबर पर्यंत तीची पोलीस कोठडी देखील आहे. पण हा एक नसून असे अनेक कारनामे तिचे आहेत. 2016 मध्ये रोसरी स्कूल चे मालक विनय आरान्हा (ललित पाटील ड्रग केस मधला आरोपी) त्याला देखील जामीन प्रकरणात फसवले होते. शीतल तेजवानी आणि तिच्या नवऱ्याने म्हणजेच सागर सूर्यवंशीने तळेगाव मधल्या एका जागेचा व्यवहार आरान्हा सोबत केला होता. ती जागा मुळात तेजवानी किंवा सागर सूर्यवंशीच्या नावाने नाहीच हे माहीत नव्हते म्हणून विनय आरान्हा ने त्यावर कॉसमॉस बँक मधून कर्ज काढले होते. हे समोर आले तेव्हा कॉसमॉस बँक नेच विनय आरान्हा ला नोटीस पाठवली. या बाबत आरान्हा कोर्टात गेले असता त्यांना समजले की तेजवानी आणि सूर्यवंशी या दोघांनी त्याचाच विरोधात करारनामा रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world