विधानपरिषदेतील पराभवानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, पुढील भूमिका केली स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत मी निवडणुकीत उभा होतो. शरद पवार गटाची 12 पैकी 11 मते मला मिळाली. तर एक मत फुटले, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानपरिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. या पराभवानंतर जयंत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आहे. राज्याच्या राजकारणात असं कधी झालं नव्हतं. दोन्ही सभागृह ताब्यात घेऊ, अशी मानसिकता दिसून येते आहे. या पराभवाचं आम्ही चिंतन करु, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवार गटाचं एक मत फुटलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत मी निवडणुकीत उभा होतो. शरद पवार गटाची 12 पैकी 11 मते मला मिळाली. तर एक मत फुटले, तर शेकापचं एक मत मला मिळालं. मला चार मत मिळाली असती, तर दुसऱ्या प्राधान्याची 25 ते 30 मते घेऊन निवडून आलो असतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

(नक्की वाचा- मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार)

काँग्रेसची दुसऱ्या प्राधान्याची मते आम्हाला मिळतील अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही. काँग्रेसची दुसऱ्या प्राधान्याची मते समान वाटायला हवी होती. तसं झालं असतं तर कदाचित निकाल असा लागला नसता. पण त्यांनी ठाकरे गटाला प्राधान्य दिलं. माझ्या पराभवाबाबत कदाचित दिल्लीतील काँग्रेस नेते दखल घेतील, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )

ठाकरे गट आणि इतर मित्र पक्षांनी मिळून सहकार्य केले. आम्ही काही ठिकाणी गाफील राहीलो. शरद पवार यांनी टिप्स दिल्या पण काही प्रमाणात तसं झालं नाही. शरद पवार यांची तब्येत ठीक नाही यामुळे भेट झाली नाही. शरद पवार यांनी  मनापासून खूप काम केले, याबाबत जयंत पाटील यांनी शरद पवारांचे आभार मानले.

Advertisement

जयंत पाटलांची पुढील भूमिका?

आमचे कार्यकर्ते अजिबात नाराज नाहीत. आमची पुढील भूमिका देखील हीच आहे की, आम्ही महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यासोबत आहोत. या कुठलाही बदल होणार नाही. एक निवडणूक हरलो म्हणून भूमिका बदलत नसते.