शिवसेनेचा मास्टरप्लॅन! उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाजपच्या पावलावर पाऊल; मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांकडे 22 जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली असून, मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी यांचे प्राबल्य असलेल्या भागात पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Political News: आगामी निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी रणनीती आखली आहे. भाजपच्या संघटनात्मक कौशल्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता शिवसेनेतर्फे 'संपर्क मंत्री अभियान' राबवण्यात येणार आहे. मुंबईतील 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत या मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदेंनी 22 जिल्ह्यांमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

'संपर्क मंत्री' आणि जबाबदारीचे जिल्हे

  • गुलाबराव पाटील - जळगाव आणि नंदुरबार
  • उदय सामंत - नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर)
  • योगेश कदम - ठाणे आणि पालघर
  • प्रताप सरनाईक - अमरावती आणि अकोला
  • संजय राठोड - यवतमाळ आणि वाशिम
  • प्रतापराव जाधव - नागपूर आणि वर्धा
  • शंभुराज देसाई - गडचिरोली आणि चंद्रपूर
  • दादा भुसे - धुळे आणि बुलढाणा
  • संजय शिरसाट - भंडारा आणि गोंदिया 
  • प्रकाश आबिटकर - नांदेड आणि हिंगोली 
  • आशिष जयस्वाल - जालना 
  • भरत गोगावले- बीड 

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

मित्रपक्षांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव

या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ पक्ष वाढवणे हा नसून, जिथे भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या मित्रपक्षांचे प्राबल्य आहे, तिथे शिवसेनेची स्वतंत्र ताकद निर्माण करणे हा आहे. मागील स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता, तोच उत्साह कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी आक्रमक आणि नियोजनबद्ध पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. अशा परिस्थितीत मंत्र्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून जिल्हावार दौरा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 

Topics mentioned in this article