अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Bhima Shankar Temple Viral Video : पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच पुणे जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. देविदास मोरे यांनी पुण्यातील भीमाशंकर मंदिरात एका पुजाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडलीय. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेत्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते आणि पुजारी यांच्यात बाचाबाची झाली अन्..
मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर देवस्थानात सतत वादविवाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे.सुरक्षारक्षकांनी एका शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती.भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांची अडवणूक केल्याची प्रकरणही समोर आली होती.देविदास दरेकर आणि पुजारी यांच्यात बाचाबाची झाली आणि नंतर अशा पद्धतीने मारहाणीचा प्रकार घडला, असं देविदास दरेकर यांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> GK News: महाराष्ट्राच्या जवळच आहे भारतातील 9 राज्यांपेक्षाही मोठा जिल्हा, इथेच वसलंय जगातील सर्वात श्रीमंत गाव
महाराष्ट्र शासनाकडून 250 कोटी रुपयांचा निधी
कोरोनानंतर भाविकांचा ओघ लक्षणीय वाढला असून दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याचा ताण मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवरही वाढताना दिसतो आहे. वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून अनेकदा दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. सध्या महाराष्ट्र शासनाने जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व परिसराच्या सुशोभीकरणासाठी मंजूर केला आहे. मात्र सभामंडपाच्या सुरू असलेल्या कामांमुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नक्की वाचा >> आईने मुलांना साडी नेसवली, मेकअपही केला..दोघे भाऊ तृतीयपंथी बनून बाजारात गेले, 1 दिवसाची कमाई पाहून सर्वच थक्क
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे देशातील सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. संपूर्ण देशभरातून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविकांची संख्या प्रचंड वाढते. भीमाशंकर मंदिराकडे जाणारा मार्ग अरुंद असून मंदिर परिसर अभयारण्यात असल्याने विस्तारासाठी मर्यादा आहेत. वनविभागाचे नियम, अपुरी जागा आणि वाढती गर्दी यामुळे मागील काही वर्षांपासून श्रीक्षेत्राचा विकास करणे मोठे आव्हान ठरत आहे.