महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडला. त्यानंतर अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरुच आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॅार्म्युला ठरला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार असल्याचं ठरलं आहे. एकनाथ शिंदे आज दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लावायची याची यादी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले; केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात)
मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रिपदासाठी मिळणार आहे. शिवसेनेच्या या अडीच-अडीच वर्षाच्या फॅार्म्युल्यामुळे शिवसेना पक्षातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी देणारा शिवसेना फॅार्म्युला असणार आहे.
(नक्की वाचा : शरद पवार- अजित पवारांची दिल्लीत भेट! काय झाली चर्चा? दादा म्हणाले...)
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांचं लॉबिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी मंत्र्याकडून मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू आहे. अजित पवार यांना भेटण्याठी माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील देवगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील देवगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत.
माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपलं मंत्रिपद सुरक्षित करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून लॉबिंग सुरू झालं आहे.