बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर तो पहिल्यांदाच मीडिया आणि चाहत्यांसमोर आला. हल्ल्या आणि मोठ्या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान एकदम फिट दिसत होता. यावरुन शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सैफ अली खानबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
अवघ्या पाच दिवसांत हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर, “तो इतका फिट कसा आहे”? असा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला. संजय निरुपम यांनी सैफ अली खानबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे त्यांच्यावरही टीका होत आहे.
(नक्की वाचा - Saif Ali Khan Attacked : सैफ प्रकरणात मोठी अपडेट, अखेर हल्लेखोराला ठाण्यातून अटक; गुन्ह्याचीही कबुली)
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर सैफ अली खानचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "डॉक्टरांनी सांगितले की चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर घुसला होता. बहुधा तो आत अडकला असावा. त्यानंतर सलग 6 तास ऑपरेशन चालले आणि हे सर्व 16 जानेवारीला घडले. आज 21 जानेवारी आहे.अवघ्या पाच दिवसात हॉस्पिटलमधून बाहेर पडताच एवढा फिट? अवघ्या पाच दिवसात? कमाल आहे!"
सैफ अली खानला उपचारासाठी दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनीही त्याच्या धाडसाचे कौतुक केले. लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर आणि ट्रस्टी यांनी सैफबद्दल सांगितले होते की, सैफच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. तो सिंहासारखा आला. 6 ते 7 वर्षांचा त्याचा लहान मुलगा तैमूर त्याच्यासोबत होता. तो चालत आला. तो खरा हिरो आहे.
हल्ल्यानंतर 6 दिवसांनी 16 जानेवारी रोजी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अभिनेत्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांनी अभिनेत्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, सैफ अली खानच्या घरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.