जाहिरात

Saif Ali Khan Attacked : सैफ प्रकरणात मोठी अपडेट, अखेर हल्लेखोराला ठाण्यातून अटक; गुन्ह्याचीही कबुली

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

Saif Ali Khan Attacked : सैफ प्रकरणात मोठी अपडेट, अखेर हल्लेखोराला ठाण्यातून अटक; गुन्ह्याचीही कबुली

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर मुंबई पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्याला अटक केली आहे. या अटकेसाठी विविध विभागांमध्ये तब्बल 30 टीम तयार करण्यात आली होती. आरोपीचं नाव मोहम्मद अलियान असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीना त्याने आपलं नाव विजय दास असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला रविवारी रात्री उशिरा ठाण्यातील हिरानंदानी भागातून अटक केली आहे. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांनी त्याला मुंबईला आणला असून खास पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

ठाण्यातील रिकी बारमध्ये करीत होता काम...
संशयित मोहम्मद अलियान हा ठाण्यातील रिकी बारमध्ये हाऊसकिपिंगचं काम करीत होता. सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबावर हा भयंकर हल्ला १६ जानेवारी रोजी झाला. आरोपी सैफच्या वांद्रे येथील घरात चोरीसाठी गेला होता. यादरम्यान सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता. 

Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला

नक्की वाचा - Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला

असा पकडला हल्लेखोर...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दास उर्फ मोहम्मद अलियान आधी मुंबईतील एका पबमध्ये काम करीत होता. त्यानंतर तो ठाण्यातील एका बारमध्ये काम करू लागला. पोलिसांनी सैफ प्रकरणातील हल्लेखोर ठाण्यात लपल्याची सूचना मिळाली होती. टीमने ठाणे पश्चिमेकडील हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे सुरू असलेल्या मेट्रोच्या ठिकाणी छापा मारला. आरोपी येथील लेबर कॅम्पमध्ये लपला होता. 

सर्वात आधी जहांगिरच्या खोलीत पोहोचला होता...
सैफ अली खान हल्ला प्रकरणात हल्लेखोर आधी जहांगीरच्या खोलीत घुसला होता. घरातील कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पाहून आरडाओरडा केला. ज्यानंतर सैफ अली खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री करिना कपूर खाली आले. यानंतर सैफ अली खान आणि हल्लेखोरामध्ये झालेल्या झटापटीमध्ये सैफ गंभीर जखमी झाला. 


   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com