शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख वाघ असा केला आहे. विदर्भात फडणवीस एक वाघ आहे, अजून किती वाघ वाढवणार असा सवाल नरेंद्र बोंडेकर यांनी उपस्थित केला. विदर्भातील वाघांची वाढत्या संख्येवरून नरेंद्र बोंडेकर यांनी विधिमंडळात मत मांडलं. मात्र नरेंद्र बोंडेकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदा जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"विदर्भात आमच्याकडे देवेंद्र फडणवीस वाघ आहेत. एवढे वाघ विदर्भात काय करायचे आहेत. काही वाघ, बिबटे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जा किंवा गुजरातला पाठवा. आमच्याकडे किती देता. विदर्भात गावात राहण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. वन विभागाचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते मार्गी लागत नाहीत", असं नरेंद्र बोंडेकर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- "त्यांच्या बापाला मी कळलो...", विधानसभेत आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटलांमध्ये खडाजंगी)
नरेंद्र बोंडेकर यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "तुमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचं प्रेम समजू शकतो. मात्र त्यांना एका प्राण्याची उपमा देणे हे काही सभागृहात शोभत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं वक्तव्य मागे घ्यावेत. यावर बोंडेकर यांनी म्हटलं की, "देवेंद्र फडणवीस आपल्यातले टायगर आहेत. तुम्ही मानत नाही का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील टायगर आहे."
धोका असलेल्या गावांना कुंपण घालावे- वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत म्हटलं की, वाघांची संख्या वाढली आहे. गाव जंगलाच्या जवळ आहेत. त्यामुळे चॅनलिंग फेन्सिंग करा. बिबट्या गावात येत आहेत.शेतीचे लोकांची जीवन हानी होते. शेती हंगामात ते शेतात जाऊ शकत नाही. वाघ, बिबट्यांचा धोका असेलली गावे शोधावीत आणि तिथे कुंपण घालावे, जेणेकरुन प्राणी येणार नाही.
(नक्की वाचा - Akola Crime : पत्नी परीक्षेसाठी माहेरी; पतीने मामेबहिणीला पळवून केलं लग्न; तरुणीचा पोलीस ठाण्यात राडा )
सोलर फेन्सिंगसाठी 200 कोटी रुपये मान्य- वनमंत्री
नरेंद्र बोडेंकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिलं. 2002 साली 101 वाघ होते. आता 2025 साली 444 वाघ आहेत. 25 वर्षात वाघांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. 200 कोटी रुपये सोलर फेन्सिंगसाठी मान्य झाले आहेत. यासाठी पाठपुरावा करु असा शब्दही वनमंत्र्यांनी दिला.