धक्कादायक! उष्माघाताने 1500 पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू 

भंडाराच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील बाबा पोल्ट्री फार्म केंद्रातील सुमारे 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली.

Advertisement
Read Time: 1 min
भंडारा:

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे.  सूर्य आग ओकू लागला असताना उष्णतेचे प्रखर चटके बसत आहेत. अशात भंडाराच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील बाबा पोल्ट्री फार्म केंद्रातील सुमारे 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. सध्या उष्णतेचा प्रचंड त्रास सुरू झाला आहे. माणसांबरोबरच प्राण्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. उष्णतेची प्रखरता सहन न झाल्याने कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामध्ये 1531 कोंबड्यांना जीव गमवावा लागला आहे. चार तासपर्यंत विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुक्कुटपालक संचालकांकडून करण्यात आला आहे. तरी या प्रकरणात तपास सुरू आहे. 

बातमी अपडेट होत आहे.