आदिवासी भागात (Aadiwasi Wada) आजही पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे डोंगर-कपाऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना आपात्कालीन परिस्थितीत जीवाची बाजी लावाली लागते. खालापूर तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर आला आहे.
खालापूर तालुक्यातील आरकस वाडी उंबरनेवाडी पिरकट वाडी या आदिवासी वाड्यात आजही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. या गावामध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांनी कंबरेभर पाण्यातून मृतदेह पलीकडे न्यावा लागला. महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाण्याचा जोरदार प्रवाह असतानाही आदिवासी बांधवांना धोका पत्करावा लागत आहे. या गावात रस्ताच नसल्याने आजही येथील बांधवांना पाण्याचा ओढा पार करावा लागत आहे.
नक्की वाचा - आईचा मृत्यू, लेक दोन दिवस मृतदेहा शेजारीच बसून, दरवाजा उघडला अन्...
मृत महिलेला खांद्यावरून नेताना गावकऱ्यांना धोका पत्करावा लागत आहे. केवळ अंत्यसंस्कारासाठीच नाही तर कामानिमित्त बाहेर जातानाही हाच धोकादायक ओढा पार करून जावं लागतं. दोन गावांच्या मधल्या भागात पावसाच्या पाण्यामुळे मोठा ओढा तयार होतो. अशा परिस्थितीत स्थानिक रहिवाशांना दोरीच्या मदतीने जीव मुठीत घेऊन ओढा पार करावा लागतो. पाऊस वाढला तर प्रवासही करता येत नाही आणि घरातच राहावे लागते. कोणी आजाची पडले किंवा आपात्कालीन परिस्थितीही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.