कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरात झोपेत महिलेचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाला त्यावेळी त्या महिले बरोबर तिचा 14 वर्षीचा मुलगा होता. मृत्यू नंतर तो मुलगा आईच्या मृतदेहा शेजारीच बसला होता. दोन दिवस तो तसाच बसून होता. जेव्हा शेजाऱ्यांना संशय आला त्यावेळी त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला जात नव्हता. शेवटी पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. त्यानंतर त्यांनी जे पाहीले ते धक्कादायक होते.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सेल्विया या आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिमेला असलेल्या खडकपाडा भागात राहात होत्या. सुंदर मारतीत त्यांचा फ्लॅट होता. त्यांच्या कुटुंबात सेल्विया, त्यांचे पती डॅनियल आणि 14 वर्षाचा मुलगा ऑलविन राहात होते. दोन दिवसापूर्वी डॅनियल हे कामानिमित्त बाहेर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरी पत्नी सेल्विया आणि मुलगा ऑलविन हे घरात होते. मात्र त्याच वेळी झोपेत असतानाचा अचानक सेल्विया यांचा मृत्यू झाला. मात्र त्याची काहीच माहिती कोणाला समजली नाही.त्यांच्या घराचे दार बंद होते. त्यामुळे त्यांच्या बाजूच्या लोकांनाही काही समजले नाही.
ट्रेंडिंग बातमी - भूतबाधेवर उपचारासाठी म्हणून गेली अन् घात झाला, जे घडलं ते...
दोन दिवसानंतर त्यांच्या घरातून दुर्गंधी सुटली. तेव्हा शेजारी राहणाऱ्यांनी त्यांचे दार ठोठावले. मात्र आतून काही प्रतिसाद येत नव्हता. अखेरीस सोसायटीतील नागरीकांनी खडकपाडा पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही दार ठोठावून पाहीले. आतून प्रतिसाद येत नसल्याने पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी आत प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला.
ट्रेंडिंग बातमी - सायबर गुन्हा घडल्यास ऑनलाईन तक्रार करता येते? वाचा, तक्रार करण्यासाठीचा सोपा मार्ग
घरात त्या महिला मृतदेह पडला होता. तिच्या शेजारी एक मुलगा बसला होता. महिला सेल्विया ही झोपत मृत्यूमुखी पडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तिच्या शेजारी तिचा मुलगा ऑलवीन दोन दिवसापासून बसून होता. त्याला आईचा मृत्यू झाला हे कळले नाही. पोलिसांनी मुलाची प्राथमिक विचारपूस केली असता त्याची मनस्थिती ठिक नसल्याने त्याने काही एक प्रतिसाद पोलिसांना दिला नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदना करीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनानंतर महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे? याचे खरे कारण समोर येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world