प्रांजल कुलकर्णी, नाशिक
गोदान एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांची धावपळ पाहायला मिळाली. इगतपुरीच्या मुंढेगावजवळ ही घटना घडली आहे. डब्यातून धूर निघत असल्याचं निदर्शनात आल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्यामुळे काही काळ याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गोदान एक्स्प्रेसच्या डब्यात खाली असलेल्या लायनर ओव्हर हिट होऊन घासल्याने धूर निघाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत ट्रेन थांबवली. त्याआधी धूर बघून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे अनेक प्रवाशांनी खाली उड्या मारल्या.
( नक्की वाचा : 'हिंदू मुली हा लुटीचा माल नाही', पाकिस्तानच्या खासदारानं सरकारला सुनावलं, Video )
या घटनेनंतर गोदान एक्स्प्रेस बराच वेळ मुंडेगावाजवळ उभी होती. अनेक प्रवाशी भीतीने ट्रकवर उतरले. रेल्वेतील कर्मचाऱ्यांना खाली उतरुन धूर निघत असलेल्या ठिकाणी फायर एक्सटिंग्युशरचा फवारा मारला. अखेर धूर निघणे बंद झाल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली. गाडी इगतपुरी स्थानकात पोहोचताच डब्याचा लायनर दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.