Kalyan News: कसारा रेल्वे स्थानकात मोठा अनर्थ टळला, 'या' एक्स्प्रेसमधून अचानक निघाला धूर, व्हिडीओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकावर महानगरी एक्स्प्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mahanagari Express Smoke Video

Mahanagari Express News : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकावर महानगरी एक्स्प्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने जाणारी महानगरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली, त्यावेळी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून धूर येत असल्याचं निदर्शनास आलं. अतिउष्णतेमुळे ब्रेक लायनर गरम होऊन जॅम झाला आणि धूर निघू लागला,अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. गार्डने प्रसंगावधान राखत ही माहिती रेल्वे विभागाला दिली.  त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गाडीचे लायनर मोकळे केले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली.   

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव काय म्हणाले?

याबाबत कसारा रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रोहित उबाळे यांनी म्हटलंय की, जास्त उष्णतेमुळे ब्रेक लायनर गरम झाल्याने ही घटना घडली होती. पंधरा मिनिटात दुरुस्तीचे काम करण्यात आले आणि गाडी पुढे रवाना झाली.

Advertisement

नक्की वाचा >> Trending Video: प्रेमात धोका, होणाऱ्या नवऱ्याने घेतला बदला..सोशल मीडिया स्टार रोनिशाने उचललं टोकाचं पाऊल

याबाबत कल्याण कसारा कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी म्हटलं की, "सातत्याने होत असलेल्या या घटनेमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वे मार्गावर सातत्याने या घटना होत आहेत. कधी ओव्हर हेड समस्या, कधी सिग्नलची समस्या, काही ना काही कारणाने रेल्वे वाहतूक प्रभावित होते, याचा त्रास प्रवाशांना होत आहे. रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मार्गावर होणाऱ्या समस्या संपवल्या पाहिजेत.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील पानशेत धरणात सर्वात भयंकर घटना! लोकांची एकच गर्दी जमली, स्थानिकांमध्येही घबराट

कल्याण कसारा मार्गावर सातत्याने मालगाडीचे इंजिन फेल होणे, रेल्वे रुळाला तडे जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे अशा प्रकारच्या घटना घडत असतात.आम्ही कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो.मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने ह्या सर्व घटना घडत आहेत.