सूरज कसबे, मावळ (पुणे)
मुंबई -पुणे महामार्गावरील सोमटणे फाटा आणि वरसोली हे दोन्ही टोलनाके बंद पाडण्याचा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. जुना आणि पुणे-मुंबई महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम शेळके यांनी दिला आहे. मावळ पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
ब्लॅक स्पॉट आणि कोंडीचा प्रश्न गंभीर
महामार्गावरील टोल नाक्यांच्या ठिकाणी दररोज मोठी वाहतूक कोंडी होते, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच, मार्गावरील ठराविक ब्लॅक स्पॉटवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर प्रश्नांबाबत एमएसआरडीसी (MSRDC) आणि आयआरबी (IRB) प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत, असे शेळके यांनी नमूद केले.
(नक्की वाचा- Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तरीही संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित काम होताना दिसत नाही. प्रशासनाने पुढील 10 दिवसांत वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास टोलनाके बंद करण्याचे आंदोलन छेडले जाईल.
(नक्की वाचा- Pimpri-Chinchwad School News: पिंपरी-चिंचवडमधील मनपा शाळांच्या वेळेत बदल; कसं असेल नवीन वेळापत्रक?)
महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेळेच्या बचतीसाठी आता आमदार शेळके यांनी थेट टोलनाके बंद करण्याचा इशारा दिल्याने प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world