भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारफेरीवर दगडफेक, गोवंडी येथील घटना

सोमवारी रात्री घडला प्रकार, महिला कार्यकर्त्याला दगड लागल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार दाखल

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. सत्ताधारी भाजप ४०० पेक्षा जास्त जागा घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेला आहे. अशातच ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारादरम्यान एक अनुचित प्रसंग घडला आहे. कोटेचा यांच्या प्रचार रथावर मुंबईतील गोवंडी या भागात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

कधी घडला हा प्रकार ?

सोमवारी रात्री कोटेचा यांचा प्रचाररथ गोवंडी भागात प्रचार करत असताना ही दगडफेकीची घडना घडली आहे. ज्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महिला कार्यकर्त्याला दगड लागला ?

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कोटेचा यांच्या प्रचाररथावर फेकण्यात आलेला दगड हा एका महिला कार्यकर्त्याला लागल्याचं बोललं जातंय. कोटेचा यांनी काही दिवसांपूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ज्याच्यासाठी उप-मुखमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर होते. त्यामुळे घडलेल्या घटनेबद्दल सध्या परिसरात चर्चेला उधाण आलं आहे.

हे ही वाचा - मुंबई काँग्रेसमध्ये कलह, वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध

दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दगडफेक कोणी केली याचा सखोल तपास केला जाईल अशी माहिती परिमंडळ सहा चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली. 

Advertisement