- पुणे के पिंपरी-चिंचवड़ के चिखली मोरे वस्ती इलाके में युवक पर आवारा कुत्तों ने हमला कर दिया.
- युवक ने आवारा कुत्तों से बचने के लिए फ्लेक्स बोर्ड और मोटरसाइकिल का सहारा लिया.
- स्थानीय नागरिकों ने नगर निगम से इलाके के आवारा कुत्तों को हटाने की मांग की है ताकि भविष्य में ऐसा हमला न हो.
Pune News : पुण्यात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक एका तरुणावर हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सात भटक्या कुत्र्यांनी एका तरुणावर अचानक हल्ला केला. ही घटना चिखली मोरे वस्तीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण सकाळी पाच वाजता कामावर जात होता. त्यानंतर काही भटक्या कुत्र्यांनी मागून येत त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हा तरुण जखमी झाला आहे.
बाईकमुळे वाचला जीव
कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या तरुणाने फ्लेक्स बोर्ड आणि बाईकची मदत घेतली. कुत्र्यांनी त्याच्या अंगावर हल्ला केल्यानंतर त्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी बाईकची मदत घेतली. त्याने बाईक कुत्र्यांच्या अंगावर ढकलली. पण कुत्रे तिथून हलायला तयार नव्हते. ते तरुणाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी त्याने फ्लेक्स बोर्डची मदत घेतली. त्याने आरडाओरडा केल्यानंतर काही वेळाने लोक घराबाहेर पडले. त्यानंतर त्या तरुणाला कुत्र्यांपासून वाचवण्यात आले. बराच वेळ तरुण दुकानाच्या आडोशाला उभा होता. कुत्रे तिथून निघून गेल्याचं सुनिश्चित केल्यानंतर तो बाहेर आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा कुत्र्यांच्या हल्ल्याचा मुद्दा तापला आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेने या भटक्या कुत्र्यांना तत्काळ नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भटक्या कुत्र्यांचा मुद्दा देशभरात चर्चिला जात आहे. दरवर्षी देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांना मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये (३० जून) छवी नावाच्या मुलीला मावशीच्या घरी जाताना कुत्र्याने चावा घेतला. तिने कुत्र्याला काहीच त्रास दिला नव्हता. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर मुलीचा जास्त रक्तस्त्राव झाला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे तिच्यावर रेबीजविरोधी उपचार सुरू करण्यात आले.मात्र काही आठवड्यात तिची प्रकृती अधिक बिघडली. २१ जुलै रोजी तिला उलट्या होऊ लागल्या. छवीचे हात आणि पाय सुन्न झाले, तिने बोलणंही बंद केलं. चार दिवसांनी तिचा मृत्यू झाला.