स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे महिन्यात होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही शक्यताही धुसर झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीत होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची मंगळवारी सुनावणी पार पडली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी आता 6 मे पर्यंत पुढे ढकलली आहे.
मात्र मे महिन्यातील सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निकाल मे महिन्यानंतरच लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुबंई, ठाणे, पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदेच्या निवडणुका मागील 3-4 वर्षांपासून रखडल्या आहे. या सर्व स्थानिक संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवल जात आहे.