'दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात; पुणे पोलीस आयुक्तांच्या नोटीसने खळबळ

कल्याणीनगर परिसरात असलेल्या या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. हॉटेल उशीरापर्यंत चालू ठेवत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

पुणे पोलीस आयुक्तांच्या एका नोटीसने खळबळ उडाली आहे. दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात, असं पुणे पोलीस आयुक्तांनी एका हॉटेलला दिलेल्या नोटीसमधये म्हटलं आहे. 

"एखादी अतिरेक संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.", असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला धोक्याचा हा इशारा दिला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याणीनगर परिसरात असलेल्या या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. हॉटेल उशीरापर्यंत चालू ठेवत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या हॉटेल व्यवस्थापनाकडून अनेकदा डिस्कोथेक परवान्यातील अटी शर्तीचा भंग करण्यात आले आहे. 

(नक्की वाचा-  राज्यातील जालना-जळगावसह देशातील 8 नवीन रेल्वे मार्गांना केंद्रीची मंजुरी, कसा होईल फायदा?)

पोलिसांनी वेळोवेळी याबाबत कारवाया केल्या असूनही संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून याकडे हेतू पुरस्कर कानाडळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस पत्रातून करण्यात आला आहे. दरम्यान या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने आग, चेंगराचेंगरी, गॅस गळती, अफवा यासारखी घटना घडून जीवितहानी होऊ शकते. 

(नक्की वाचा-  Video - राज यांच्या गाडीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी 'सुपाऱ्या' फेकल्या, मनसैनिकांनी धडा शिकवण्याचा 'विडा' उचलला)

तसेच सध्या अतिरेकी कारवायाबाबत अलर्ट आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या हॉटेलचा डिस्कोथेक परवाना रद्द का करण्यात येऊ नये? अशा नोटीसद्वारे हॉटेलला विचारणा करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने ही कारणे दाखवा नोटीस असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article