Mumbai News: टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत सुरू होणार, निवडक लोकांनाच निमंत्रण

Teshla Mumbai Showroom: ऑस्टिन स्थित या कंपनीने चीनमधील आपल्या प्लांटमधून 'मॉडल वाय' (Model Y) रियर-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही (SUV) प्रकारातील गाड्यांची पहिली खेप भारतात पाठवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जगातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला (Tesla Car)  पुढील आठवड्यात मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (Bandra Kurla Complex) आपले पहिले 'एक्सपिरियन्स सेंटर' सुरू करणार आहे. या उद्घाटनानंतर टेस्ला कंपनी अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल. टेस्ला ही प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांची कंपनी असून या कंपनीचे पहिले शोरूम 15 जुलैपासून सुरू होणार आहे. यामुळे मुंबईसह भारतामध्ये लवकरच टेस्ला कार धावताना बघायला मिळतील. 15 जुलै रोजीच्या कार्यक्रमासाठी निवडक लोकांना आमंत्रणे पाठवली जात असल्याचे कळते आहे.  

( नक्की वाचा: टेस्लामधून होणार Elon Musk ची हकालपट्टी? कंपनी बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! )

ऑस्टिन स्थित या कंपनीने चीनमधील आपल्या प्लांटमधून 'मॉडल वाय' (Model Y) रियर-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही (SUV) प्रकारातील गाड्यांची पहिली खेप भारतात पाठवली आहे. टेस्ला इंडियाने गेल्या महिन्यात मुंबईतील लोढा लॉजिस्टिक्स पार्क येथे 24,565 स्क्वेअर फूट जागा पाच वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी जूनमध्ये माध्यमांना माहिती देताना सांगितले होते की, टेस्लाला भारतात गाड्यांचे उत्पादन करण्यात स्वारस्य नाही, तर त्यांना फक्त देशात शोरूम (Showroom) उघडायचे आहे.  

Advertisement

( नक्की वाचा: रॅपिडोनंतर परिवहनमंत्र्यांच्या निशाण्यावर Uber Shuttle आणि Cityflo )

टेस्ला सुरुवातीला काही शुल्क सवलतींची मागणी करत होती. त्यांची अशी इच्छा होती की, 40,000 डॉलरपेक्षा कमी किमतीच्या गाड्यांवर 70% आणि अधिक किमतीच्या गाड्यांवर 100% सीमा शुल्कात सूट मिळावी.मात्र, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी यावर्षी स्पष्ट केले होते की, भारत आपली धोरणे टेस्लाच्या सोयीनुसार बदलणार नाही. ते म्हणाले होते की, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत सर्व इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना आधार मिळावा यासाठी कायदे आणि शुल्क नियम तयार केले जातील. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा अधिक वापर केल्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि तेल आयातीचे खर्चही घटेल, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे असा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement
Topics mentioned in this article