Nagpur News : नागपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का दिला आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर, दिलीप मडावी, दुर्गा रेहपाडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मनसे व इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)
माजी उपमहापौर आणि 6 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला. राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “शिवसेनेचे नगरसेवक महानगरपालिकेत निवडून आलेच पाहिजेत. आज ज्या नेत्यांनी प्रवेश केला तेच नव्हे, तर अजूनही अनेकजण माझ्या संपर्कात असून लवकरच पक्षात दाखल होणार आहेत.”
(Railway News : मुंबईत मेट्रोनंतर जमिनीखालून धावणार रेल्वे? परळ-CSMT मार्गावर विचार सुरु)
नागपूरमधील ही राजकीय घडामोड शिवसेनेच्या ताकदीत भर घालणारी आहे. याचा आगामी महापालिका निवडणुकीच्या समीकरणांवरही मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे नागपूरच्या राजकारणात शिंदे गट आक्रमक पवित्र्यात दिसत आहे.