ठाकरे गटाचा आमदार भाजपच्या वाटेवर, PM नरेंद्र मोदींच्या स्वागतावेळी काय घडलं?

ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर हजर होते. त्यामुळे उदय सिंग राजपूत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला ठाकरे गटाचा आमदार स्वागताला विमानतळावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या घटनेची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर हजर होते. त्यामुळे उदय सिंग राजपूत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आज एकीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे विमानतळाबाहेर आंदोलन करत होते. तर दुसरीकडे आमदार राजपूत नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित होते. 

(नक्की वाचा-  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय)

मुंबईत ठाकरे गटाचा धक्का

ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीती हा पक्षप्रवेश पार पडला. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. संध्या दोशी पश्चिम उपनगरातील ठाकरे गटाचा महत्वाचा चेहरा होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये हा मोठा धक्का मानला जातो. संध्या दोशी या मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 18 मधून तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत.

(नक्की वाचा- मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती)

Advertisement
Topics mentioned in this article