Thane News: भाजपनंतर शरद पवारांच्या NCP कडून घोडबंदर रोडचं नाव बदलण्याची मागणी; कारण ऐकून अनेकांना बरं वाटेल!

Thane News: ठाण्यातील ऐतिहासिक 'घोडबंदर रस्त्याचे' नाव बदलून ते 'मराठा योद्धा शूर, चिमाजी अप्पा मार्ग' करावे, या भाजपच्या मागणीवरून ठाण्यात मोठे राजकीय युद्ध पेटले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thane News: मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक अशा घोडबंदर रस्त्याच्या नामांतरावरून ठाण्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आमनेसामने आले असून, रस्त्याच्या दुरवस्थेवरून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे.

भाजप नेते आणि ठाणे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घोडबंदर रस्त्याचे नाव बदलून ते 'मराठा योद्धा शूर, चिमाजी अप्पा मार्ग' करावे, अशी अधिकृत मागणी केली आहे. मात्र, या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तीव्र विरोध दर्शवला असून प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)

16 महिन्यांत 27 मृत्यू

घोडबंदर रस्त्यावरील सद्यस्थितीवर बोट ठेवत मनोज प्रधान यांनी भाजपच्या मागणीचा चांगलाच समाचार घेतला. "सतत वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या विळख्यात अडकलेल्या घोडबंदर रोडवर गेल्या 16 महिन्यांत वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये तब्बल 27 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा रस्ता सध्या मृत्यूचा मार्ग बनला आहे. अशा धोकादायक रस्त्याला थोर मराठा पराक्रमी महापुरुष चिमाजी अप्पा यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा अवमान आहे," अशी तोफ प्रधान यांनी डागली. रस्त्याची अत्यंत दुरवस्था आणि वाढते अपघात पाहता, याचे नाव चिमाजी अप्पा मार्ग करण्याऐवजी 'यमलोक मार्ग' करावे, असा उपरोधिक आणि खोचक सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे.

(नक्की वाचा-  Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)

नामांतराच्या राजकारणावरून नेटकऱ्यांमध्येही चर्चा

भाजपने ऐतिहासिक संदर्भ देत चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध मिळवलेल्या वसई-साष्टीच्या विजयाची आठवण म्हणून हे नामांतर सुचवले आहे. परंतु, विरोधकांनी आता थेट घोडबंदरवरील पायाभूत सुविधांचा आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा लावून धरल्याने भाजप बॅकफूटवर आली आहे. सोशल मीडियावरही ठाणेकर नागरिक 'नाव बदलण्यापेक्षा आधी रस्ते सुधारा आणि कोंडी फोडा' अशीच मागणी करताना दिसत आहेत. 
 

Topics mentioned in this article