Thane News: ठाण्यात घर घेणाऱ्या या लोकांना मिळणार मोठी सवलत, लाखो रुपये वाचणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय

Thane Home News: ठाणे विभागातील 6 हजार 343 गरीब कुटुंबांना मिळणार मोठा लाभ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय...

जाहिरात
Read Time: 1 min
"Thane Home News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी"
DCM Eknath Shinde And Canva

Thane Home News: ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधितांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहे, तसेच प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची महत्त्वाची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

केंद्र शासन, राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे.एन.एन.यु.आर.एम., बी.एस.यू.पी. योजना शहरी गरिबांकरिता आहेत. ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेतंर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपटट्यांच्या जागी असून तेथील नागरिकांचे पुर्नवसन बी.एस.यू.पी. सदनिकांमध्ये केले जाते.

(नक्की वाचा: MHADA Lottery 2025: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 90 लाखांचं घर फक्त 28 लाखात.. कधी, कुठे कराल अर्ज? वाचा...)

हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामे करतात. त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणारा आहे. तसेच यातील काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकांकरिता प्रत्येकी 56 हजार ते 1 लाख 34 हजार रुपये इतका अधिभार भरावा लागणार होता. ही बाब विचारात घेऊन या योजनेंतर्गतच्या शहरी गरिबांसाठी एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलाय. या निर्णयानुसार ठाणे विभागातील 6 हजार 343 गरीब कुटुंबांना मोठा लाभ मिळणार आहे.