Thane News : 21 व्या मजल्याच्या बाल्कनीत 5 दिवस आगंतुक 'पाहुणा'; कुंड्यांमध्ये हालचाल दिसताच रहिवासी हादरले!

ठाण्यातील वाघबीळ परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील रिजन्सी टॉवरच्या २१ व्या मजल्यावर पाच दिवस अनपेक्षित पाहुण्याचा मुक्काम होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Thane News :  ठाण्यातील वाघबीळ परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील रिजन्सी टॉवरच्या २१ व्या मजल्यावर पाच दिवस आगंतुक पाहुण्याचा मुक्काम होता. तब्बल पाच दिवस या पाहुण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

५ दिवस बाल्कनीत ४ फुटांचा अजगर...

ठाण्यातील वाघबीळ परिसरातील एका टॉवरच्या २१ व्या मजल्यावर अजगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. २१ व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यांमध्ये तब्बल ३ फुटी अजगर आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल पाच दिवस या अजगराने येथेच मुक्काम ठोकला होता. न्यू होरायझन स्कूलसमोरील टॉवरमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शुक्रवारी  सर्पमित्रांना परिसरात अजगर असल्याची माहिती दिली होती. त्यांनी घटनास्थळी जात शोधमोहीम राबवली. मात्र त्यांना अजगर सापडला नाही. शेवटी २१ व्या मजल्यावर घराची पाहणी केली असता बाल्कनीत कुंड्यांजवळ तीन फुटांचा अजगर वेटोळं घालून बसला होता. सर्पमित्रांनी अजगराला पकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हरित क्षेत्रात सोडलं. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News : मुंबईचा 113 वर्षे जुना इतिहास 'नामशेष' होणार; लोकल अन् एक्स्प्रेस गाड्यांवर होणार मोठा परिणाम 

प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर आक्रमण...

या घटनेनंतर रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. राहत्या घराच्या बाल्कनीत अजगर येत असेल तर येथील नागरिकांसह लहान मुलांना धोका असल्याचं म्हटलं जात आहे. वरील घटना म्हणजे, शहर वाढत असताना मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड आणि जंगलातील जीवांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालल्याचं उदाहरण असल्याचं म्हटलं जात आहे. घोडबंदर रोड परिसराच्या जंगलात वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. त्याच्या जवळ असलेल्या वाघबीळ येथील टॉवरमध्ये ड्रेनेजच्या पाईपद्वारे अजगर बाल्कनीत पोहोचण्याची शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.