नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे. ठाणे शहराच्या नौपाडा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत नवरात्रौत्सव आणि दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहेत. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी एक अधिसूचना जारी करून 22 सप्टेंबर 2025 पासून 02 ऑक्टोबर 2025 पर्यंत अनेक रस्त्यांवर वाहतुकीत बदल केले आहेत.
नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवकाळात देवीच्या मंडपांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी होते आणि विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा: पोलिसांना अखेर जाग झाली; कोपरी, घोडबंदर रोडसह ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय)
प्रवेश बंद असलेले आणि पर्यायी मार्ग
प्रवेश बंद - गोखले रोड कडून तसेच मढवी हाउस कडून तसेच श्रद्धा वडापाव कडून राम मारुती रोडने पु.ना. गाडगीळ चौकातून ग्रीन लीफ हॉटेल मार्गे गडकरी सर्कलकडे तसेच मुस चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरची वाहने राम मारुती रोडने गजानन महाराज चौक मार्गे दगडी शाळा किवा तीन पेट्रोल पंप मार्गे किंवा अल्मेडा चौक येथून इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद - अल्मेडा चौक कडून गजानन महाराज चौक मार्गे राम मारुती रोड व स्टेशन कड़े जाणा-या हलक्या चारचाकी, दुचाकी वाहनांना पु.ना. गाडगीळ येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरची वाहने राम मारुती रोड गोखले रोडने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद - अम्लेडा चौकातून गजानन महाराज चौक मार्गे पु.ना. गाडगीळ ग्रीन लीप मार्गे स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस, अवजड वाहने यांना गजानन महाराज चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग -सदरची वाहने गजानन महाराज चौकातून उजवे वळण घेवून तीन पेट्रोल पंप हरिनिवास सर्कल मार्गे गोखले रोडने इच्छित स्थळी जातील.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे हायवेवर कशी होतेय फसवणूक? हा Insta Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
प्रवेश बंद - ठाणे रेल्वे स्टेशन कडून ठाणे महानगर पालिकेच्या बसेस तसेच एस.टी. महामंडळ बसेस तसेच चार चाकी व दुचाकी वाहनांना गडकरी सर्कल कडे जाण्यास मुस चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरची वाहने स्टेशन कडून मुस चौक टॉवर नाका, चिंतामणी चौक, गडकरी सर्कल, अल्मेडा सिग्नल मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद - गडकरी सर्कल कडुन अल्मेडा सिग्नल कडुन उजवे वळण घेणाऱ्या ठाणे महानगर पालिकेच्या बसेस तसेच एस.टी. महामंडळ बसेस यांना अल्मेडा सिग्नल येथे उजवे वळण घेण्यास 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - सदरची वाहने गडकरी सर्कल अल्मेडा सिग्नल टिएमसी सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद - चरई कट धोबी आळी मार्गे टेभीनाका येथे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना माय लेडी फेअर टॉवर जवळ 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - सदर वाहने माय लेडी फेअर टॉवर चरई कट पुढे खोपट सिग्नल मार्गे इच्छीत स्थळी जातील.
नो पार्किंग - टॉवर नाका - गडकरी रंगायतन बोटिंग क्लबपर्यंत मासुंदा तलाव रोडचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किग मनाई असेल.