Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी 'या' भागात होणार पाणी कपात, वाचा संपूर्ण यादी

Thane Water Cut: ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनेक भागात शुक्रवारी पाणी कपात जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Thane Water Cut: ठाणे महानगरपालिकेने (TMC) स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. च्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवार, 25 जुलै 2025 रोजी शहरातील अनेक भागांमध्ये पाणी कपात जाहीर केली आहे.

ठाणे शहरातील  घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरी पाडा, वाघबीळ या भागात शुक्रवारी (25 जुलै 2025)  सकाळी 9:00 ते रात्री 9:00 या वेळेत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

तर, समतानगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेती बंदर, कळवा व मुंब्र्याचा काही भाग येथे शुक्रवार दि. 25/07/2025 रोजी रात्री 9.00 ते शनिवार, दि. 26/07/2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत पर्यंत बंद राहील. 

शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे व इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करुन ठेवावा, असे आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे. 

Advertisement

ठाणे महानगरपालिकेने 'X' पोस्टमध्ये माहिती दिली आहे: "स्टेम प्राधिकरणाने जाहीर केले आहे की, दुरुस्तीसाठी नियोजित असलेला मंगळवार, 22 जुलैचा शटडाऊन आता शुक्रवार, 25 जुलै रोजी होईल."

( नक्की वाचा : Maharashtra Weather Update : 26 जुलैला Red Alert! महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा? )

यापूर्वी पाणी कपात 22 जुलै रोजी नियोजित होती, परंतु ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, "वागळे आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या जय भवानी नगर पंप हाऊस येथील पंपाचे तातडीचे दुरुस्ती काम मंगळवार, 22.7.2025 ऐवजी शुक्रवार, 25.7.2025 रोजी करण्यात येणार असल्याने, शुक्रवार रोजी दुपारी 12:00 ते रात्री 9:00 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article