Mumbai To Pune : मुंबई-पुण्यासाठी आणखी एक मार्ग, जुन्या हायवेवर टोल वसुली; प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग

 पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा एक तिसरा नवा मार्ग लवकरच आकाराला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

New route from Mumbai to Pune : पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा एक तिसरा नवा मार्ग लवकरच आकाराला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याचा जुना हायवे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरुन मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई असा प्रवास केला जातो. याशिवाय एका नव्या रस्त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होणार असून प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

कसा असेल नवा मार्ग? l new route from Mumbai to Pune

नवा मार्गाच्या पहिल्या टप्प्यात पागोटे (अटल सेतू जवळ) ते चौक (कर्जत) पर्यंत बांधला जाईल. हा रस्ता पुढे लोणावळ्यातून पवना खोऱ्यामार्गे मुळशीतून खेड-शिवापूर येथील रिंग रोडला जोडला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा रस्ता ८ पदरी प्रस्तावित असला, तरी भविष्यातील गरज ओळखून तो १६ पदरी करता येईल, इतकी जागा संपादित केली जाणार आहे.

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, विद्यार्थी जखमी

जुन्या हायवेचं रुप बदलणार...

मुंबई-पुणे जुन्या हायवेचं रुंदीकरण करण्यात येणार असून तो ६ पदरी करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'DPR' तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या रस्त्यावर २०३० पर्यंत आयआरबीकडून टोल वसुली केली जाणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. 

घाट क्षेत्रात 'मिसिंग लिंक' आणि या नवीन तिसऱ्या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होईल. अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय लोणावळा, खोपोली आणि खालापूर या शहरांसाठी नवीन बायपास तयार केले जातील, ज्यामुळे शहरांतर्गत होणारी गर्दी कमी होईल. अटल सेतूमुळे मुंबईतून येणारी वाहतूक थेट या नवीन एक्सप्रेस-वेच्या माध्यमातून पुण्याच्या रिंग रोडपर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचू शकेल. महाराष्ट्र टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article