जाहिरात

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, विद्यार्थी जखमी

पोलिसांनी अचानक येऊन लाठ्या फिरवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती.

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, विद्यार्थी जखमी

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : पुण्याच्या लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वसतिगृहात मंगळवारी रात्री होळी साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, कॅम्पसमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार...

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहात विद्यार्थी धुलिवंदन साजरा करत होते. रात्रीच्या वेळी अचानक पोलीस कर्मचारी वसतिगृहात घुसले आणि त्यांनी सेलिब्रेशन थांबवण्याचे आदेश दिले. कॅम्पसमध्ये काही बेकायदेशीर हालचाली किंवा निषेध सभा होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांनी अचानक येऊन लाठ्या फिरवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती. एका विद्यार्थ्याने पोलिसांना कारवाईचे कारण विचारले असता, त्याला धक्काबुक्की करून लाठीने मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर शांततेत सण साजरा करत असतानाही पोलिसांनी अटकेची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या कारवाईमुळे परराज्यातून पुण्यात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

नक्की वाचा - Pune News : 2 महिन्यापूर्वी ओपनिंग अन् आता हातोडा, विमाननगरमधील प्रसिद्ध 'द रामेश्वरम कॅफे'वर पालिकेची कारवाई

या बाबत लोहगाव पोलिस चौकशी करत असून ,  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर बाबी तपासून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com