Malvan News : साताऱ्याहून सुट्टीसाठी कोकणात आले, तिघे मित्र समुद्रात उतरले अन् घात झाला

तिघेही मित्र मालवणात समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी घालवण्यासाठी आले होते. डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी तिघेही समुद्रात उतरले अन् घात झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील विविध पर्यटन स्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे. कोकणात समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र समुद्रकिनाऱ्यावर मौज मजा करताना भान जपणं आवश्यक आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. दरम्यान उन्हाळी सुट्टीत समुद्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मालवणात आलेल्या एका पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणमधील तारकर्ली समुद्रात सातारा येथील तीन पर्यटक बुडाले होते, त्यापैकी दोघांना वाचण्यात यश आलं. मात्र एकाच मृत्यू झाला. सातारा येथील ऋषिकेश दारासिंग वाघमोडे या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ओंकार शेलार आणि आकाश बोबले या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. 

नक्की वाचा - Pune Crime : पाकिस्तान समर्थनार्थ पोस्टमुळे पुण्यातील विद्यार्थिनीला अटक, आता सिंहगड महाविद्यालयाकडूनही मोठी कारवाई

तिघेही मित्र मालवणात समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी घालवण्यासाठी आले होते. डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी तिघेही समुद्रात उतरले. समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटत असतानाच लाटेच्या तडाख्यात ऋषिकेश वाघमोडे यांसह अन्य दोघे पाण्यात बुडाले. यावेळी इतर तिघांनी आरडाओरडा केला असता किनाऱ्यावर असलेले ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार यांनी समुद्रात धाव घेत. स्थानिकांनी दोघांना समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविलं. मात्र ऋषिकेश वाघमोडे याला वाचवता आलं नाही. त्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. 

Advertisement